आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रदेश कार्यकारिणी:क्षत्रिय महासभा बैठकीत केली चर्चा ; महाराणा प्रताप व भारत मातेच्या प्रतिमेला माल्यार्पण

अमळनेर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील बन्सीलाल पॅलेसमध्ये अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या महाराष्ट्र राज्याची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करुन ते सर्वानुमते मंजूर करण्यात आले.प्रारंभी हिंदू सूर्य श्री महाराणा प्रताप व भारत माता यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. अखिल भारतीय क्षत्रिय महासभेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्रसिंह राजपूत व प्रदेश कार्यकारिणीच्या वतीने संघटना मजबूत व क्रियाशील करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या बैठकीत क्षत्रिय राजपूत समाजाचे वरिष्ठ सरचिटणीस दिलीपसिंह ठाकूर, व्यापारी उद्योग सेलचे अध्यक्ष जीवनसिंह बयस, प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. अजयकुमारसिंह रावल, राज्याचे उपाध्यक्ष चंद्रशेखरसिंह राजपूत यांच्या प्रमुख उपस्थितीत विषय पारित करण्यात आले. या वेळी शहरातील सर्व समाजबंधूनी सर्व विषयांना एक मुखाने मंजुरी दिली. बैठकीस येथील नरेंद्रसिंह ठाकूर, चंदुसिंह परदेशी, मोहनसिंह परदेशी, रमेशसिंह परदेशी, सुभाषसिंह परदेशी, राजसिंह कच्छवा, राजूसिंह परदेशी, रणजितसिंह परदेशी, अनिलसिंह परदेशी हजर हाेते.

बातम्या आणखी आहेत...