आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:पाचाेऱ्यातील बैठकीत ग्राहक दिनाबाबत चर्चा‎

पाचोरा5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील हुतात्मा स्मारक येथे‎ ६ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता महाराष्ट्र‎ प्रदेश प्रवासी महासंघ व ग्राहक पंचायतीची‎ बैठक नाशिक विभागीय संघटक संजय‎ शुक्ल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात‎ आली. या बैठकीस विभागीय सचिव‎ प्रा.डॉ. आत्माराम महाजन, जिल्हाध्यक्ष‎ मनोज जैन, जिल्हा संघटक राजेंद्र शिंपी,‎ तालुकाध्यक्ष शांताराम चौधरी, उपाध्यक्ष‎ अनिल येवले, कार्यकारी संघटक प्रा.‎ वैशाली बोरकर, जिल्हा सदस्य मनीषा‎ पाटील, नयना शेंडे, नंदकुमार शेलकर,‎ राहुल महाजन, दिलीप पाटील यांच्यासह‎ सदस्य उपस्थित होते.

बैठकीत २४ डिसेंबर‎ राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करणे,‎ ग्राहक चळवळ सामान्य नागरिकांपर्यंत‎ पोहाेचवणे, तसेच प्रत्येक तालुक्यातील‎ ग्राहक संरक्षण समितीवर चार नावे‎ जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवणे, अशा‎ विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.‎ सूत्रसंचालन शांताराम चौधरी यांनी तर‎ राजेंद्र शिंपी यांनी आभार मानले.‎

बातम्या आणखी आहेत...