आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:बहाळ येथील बैठकीत रथोत्सवाबाबत चर्चा

बहाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील मुख्य चौकातील कुलस्वामिनी सारजा बारजा माता व विठ्ठल मंदिराच्या सभागृहात रविवारी सकाळी १० वाजता बैठक घेवून रथोत्सव व कीर्तन सप्ताहाच्या नियोजनाबाबत चर्चा केली.गेल्या दोन वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने रथोत्सव व कीर्तन सप्ताह बंद होता. मात्र, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे सर्वच सण, उत्सव उत्साहात साजरे करावेत, अशी ग्रामस्थांकडून मागणी केली जात आहे.

दरम्यान, २९ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या अखंड हरीनाम कीर्तन सप्ताह व ६ ऑक्टोबरला साजरा होणारा रथोत्सवाचे नियोजन करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले हाेते. या वेळी मंदिर समितीचे अध्यक्ष संतोष भोई यांनी मागील वर्षाचा खर्च सांगितला. तसेच आगामी कीर्तन व रथोत्सव खर्चाच्या नियोजनावर चर्चा केली. या वेळी सरपंच राजेंद्र मोरे, ग्रामपंचायत सदस्य नाना भोई, मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष बापू कोठावदे, सचिव गणेश सोनार, सहसचिव एकनाथ कोळी, खजिनदार विनोद चौधरी, सदस्य रोहिदास भोई, सुनील करणकाळ, भावडू महाजन, गोविंद परदेशी, अनिल पाटील, संतोष अहिरे, प्रकाश वाघ, वैभव पिंगळे, कांतीलाल कोळी, कैलास शिंपी, दशरथ मोरे आदी उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...