आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॅगिंग:देशमुख महाविद्यालयात रॅगिंगविराेधी कायद्याबाबत चर्चा

भडगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय आणि रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच कायदेविषयक जनजागृती शिबिर पार पडले. त्यात रॅगिंग विराेधी कायदा (अँटी रॅगिंग लॉ) व वाहतूक नियम या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

या शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्ष व्ही. एस. मोरे उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.एस.डी. भैसे होते. या शिबिरात नाशिकच्या आराेग्य विज्ञान विद्यापीठाचे माजी कक्षाधिकारी ॲड.किशोर पाटील यांचे रँगिंगविराेधी विषयावर तर वाहतूक नियम विषयावर तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड.नीलेश तिवारी यांचे व्याख्यान झाले. ॲड. पाटील यांनी विविध कायद्यांच्या माध्यमातून रॅगिंगसंदर्भात मुलांनी काय दक्षता घ्यावी, याविषयी मार्गदर्शन केले.

ॲड.तिवारी यांनी रस्ते अपघात यामध्ये तरुणांची भूमिका आणि त्यांचे कार्य याबाबत प्रबाेधन केले. न्या.व्ही.एस. मोरे यांनीही मार्गदर्शन केले. त्यांनी होणारे अपघात आणि शैक्षणिक संकुलामध्ये वाढते रॅगिंग याविषयी मत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगत डॉ.भैसे यांनी व्यक्त केले. त्यांनी महाविद्यालयात अँटी रॅगिंग सेल कार्यरत असून महाविद्यालयात आजपर्यंत एकही रॅगिंग संबंधित प्रकरण उद्भवले नसल्याची माहिती दिली. तसेच महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे वाद सामंजस्याने सोडवले जातात, असे सांगितले. प्रास्ताविक प्रा.डॉ.बी.एस. भालेराव यांनी केले तर आभार उपप्राचार्य प्रा.एस.आर. पाटील यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...