आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहन:शेळावेत विहिरीवरुन वाद, पुतण्याने काकूच्या अंगावरुन चालवले वाहन

पारोळा21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील शेळावे खुर्द येथे शेतीच्या वादातून २२ वर्षीय सख्या पुतण्याने आपल्या काकूस छोटा हत्ती या वाहनाखाली चिरडल्याने ४५ वर्षीय काकूचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १० रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत बापू काळू सांगळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, बापू सांगळे यांचे सख्खे भाऊ दत्तू सांगळे व त्यांची शेती लागून आहे. या विहिरीवर पाणी भरण्याचा सामायिक अधिकार असून १० रोजी सकाळी अलकाबाई बापू सांगळे, विद्या महेंद्र सांगळे, मनीषा दत्तू सांगळे, दत्तू सांगळे हे आपापल्या शेतात काम करत होते. या वेळी पाण्याचा पंप बंद केल्यावरून महिलांमध्ये जोरदार वाद झाले.

यात विद्या सांगळे व मनीषा सांगळे या जखमी झाल्या. ही घटना दत्तू सांगळे यांचा मुलगा राहुल उर्फ सोनू सांगळे यास माहिती पडताच त्याने आपल्या ताब्यात असलेले छोटा हत्ती वाहन (एमएच- १९, सीवाय- ८१८३)हे भरधाव घेऊन शेतात आला. तसेच काहिही विचार न करता त्याने आपल्या काकू अलकाबाई बापू सांगळे यांच्या अंगावर दोन वेळा हे वाहन चालवल्याने अलकाबाई यांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...