आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्र सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या विविध योजना समजावून घेत त्यासाठी पाठपुरावा करा. जेथे अडवणूक होईल, ती अडचण जाहीरपणे मांडा. बचत गट असो वा लहान व्यावसायिक यांच्या योजनांच्या माध्यमातून केंद्र सरकार आपल्या खंबीर पाठीशी उभे आहे. महिलांना आत्मनिर्भर होण्याची ही सुवर्णसंधी आहे. आगामी काळात स्वत:ची आर्थिक प्रगती करुन परिसराच्या महिलांना आत्मनिर्भरतेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन खासदार उन्मेष पाटील यांनी केले. चाळीसगाव शहर व तालुक्यातील महिला, युवतींसाठी खासदार उन्मेष पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा महिला आत्मनिर्भर अभियानाचा भूषण मंगल कार्यालयात शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बाेलत हाते.
कार्यक्रमास माेठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. प्रारंभी बचत गटांच्या महिलांनी लावलेल्या विविध स्टॉलवर जाऊन खासदार पाटील यांनी पदार्थांची चव घेत यासाठी महिलांनी घेतलेले कष्ट व पाककृती समजून घेत महिलांचा उत्साह वाढवला. तसेच लहान व्यावसायिकांना पंतप्रधान स्व:निधि, महिला आर्थिक विकास महामंडळ, बचत गटांना कर्जाची रकमेचा धनादेश खासदार उन्मेष पाटील व मान्यवरांच्या हस्ते या वेळी वितरित करण्यात आले.
या वेळी भाजपच्या जिल्हाध्यक्ष रेखा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष के. बी. साळुंखे, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, उमंग महिला परिवाराच्या संपदा पाटील, बाजार समितीचे माजी सभापती मच्छिंद्र राठोड, सरदार राजपूत, विश्वजित पाटील, जि. प. माजी सदस्या मंगला जाधव, भाऊसाहेब जाधव, पं. स. चे माजी सभापती संजय पाटील, माजी सभापती स्मितल बोरसे, उपसभापती सुनील पाटील, दिनेश बोरसे, नगरसेवक बापू अहिरे व चंद्रकांत तायडे, तालुका कृषी अधिकारी चंद्रशेखर साठे, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, उमेद जिल्हा व्यवस्थापक हरीश भोई आदी हजर होते. महिलांनी घराबाहेर पडून रोजगार निर्मितीतून कुटुंबाला आत्मनिर्भर करावे, असे आवाहन खासदार पाटील यांनी या वेळी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.