आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्याचे वितरण:अंतुर्ली शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण

अमळनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अंतुर्ली-रंजाणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत शनिवारी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते लेखन साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शीतल पाटील यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाला प्रा. एम. एस. पाटील, नितीन पाटील, प्रवीण पाटील, प्रा. नेहा पाटील, शिवाजी पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी नितीन पाटील, प्रवीण पाटील यांनी विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप केली. निवृत्त मुख्याध्यापक स्वर्गीय साहेबराव श्रावण पाटील यांच्या पुण्य स्मरणार्थ हा उपक्रम राबवण्यात अाला. सूत्रसंचालन प्रा. भरत पाटील यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...