आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:जिराळी येथील विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा पुस्तकांचे वितरण

पारोळाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुस्तक वाचून मिळवलेले विचार कधीही चोरी अथवा नष्ट होऊ शकत नाही. आपल्या जीवनात पुस्तकांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. साेशल मीडियापासून वेळीच सावध हाेवून समाजाने अन्नदानासोबत पुस्तक वाटप, झाडे लावा व जगवा ही मोहिम हाती घेतली पहिजे. शहाणपण हे आपल्यातच आहे, त्याचा उपयोग करून कुटुंब व समाजाची प्रगती साधा, असे आवाहन प्रा.डॉ. लिलाधर पाटील यांनी केले.

जिराळी येथे पहिलवान पंजाबराव पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त पंजाबराव पाटील प्रतिष्ठानतर्फे आयोजित व्याख्यानात प्रा.डॉ. लिलाधर पाटील मार्गदर्शन करत हाेते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंधवे येथील प्रगतशील शेतकरी रामराव पाटील होते. कार्यक्रमास जिराळी-इंधवे येथील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक गणेश जाधव, संजय मोरे, किशोर पाटील आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पंजाबराव पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा पाराेळा येथील उत्कर्ष प्राथमिक विद्या मंदिराचे मुख्याध्यापक संदीप पाटील यांनी स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासिकेसाठी माेफत पुस्तके उपलब्ध करुन दिली. एमपीएससी, पोलिस, सैन्य, स्टॉफ सिलेक्शन, जनरल नॉलेज आदी मोफत पुस्तकांचे मान्यवरांचे हस्ते वाटप करण्यात आले. प्रास्ताविक संदीप पाटील, सूत्रसंचालन अमळनेर येथील मराठा सेवा संघाचे सचिव प्रेमराज पवार यांनी केले. विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. संदेश माने यांनी आभार मानले. या वेळी शिक्षक दीपक पाटील, आर. एच. पाटील, धनराज पाटील, सिद्धार्थ बिऱ्हाडे, अशोक पाटील उपस्थित होते. कार्यक्रमास शुभम पाटील, हरीष पाटील, कल्पेश पाटील, सुमित पाटील, यश पाटील, गौरव पाटील, आनंद पाटील, उदयनराजे पाटील यांनी सहकार्य केले. या उपक्रमाचे सर्वत्र काैतुक हाेत आहे.

बातम्या आणखी आहेत...