आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाैरव:रोटरी क्लबतर्फे १६ शिक्षकांना नेशन बिल्डर पुरस्कारांचे चोपड्यात वितरण

चोपडा22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षकांमध्ये संस्कार महत्त्वाचे आहेत. माझी आई कविता वाचायची, ते कवितेचे संस्कार काय असतात, हे मला चांगले माहिती आहे. प्रत्येक शिक्षकाला आई होता आले पाहिजे. लहान मुले मातीचे गोळे असतात. त्यांना लहानपणीच्या जसा आकार द्याल, तसे ते घडतील, म्हणून शिक्षकांनी सर्व गुणसंपन्न असले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी, साहित्यिक प्रा. वा. ना. आंधळे यांनी केले.

दरवर्षाप्रमाणे यंदाही चोपडा तालुका रोटरी क्लबतर्फे सायंकाळी ६ वाजता माध्यमिक व प्राथमिक अशा दोन वेगवेगळ्या गटांमध्ये शिक्षकांना नेशन बिल्डर अवॉर्ड देण्यात आले, या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कवी तथा साहित्यिक प्रा. वा. ना. आंधळे उपस्थित होते, त्या वेळी मार्गदर्शन करताना ते बाेलत हाेते. या वेळी त्यांच्याच हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या वेळी मंचावर रोटरी क्लबचे अध्यक्ष अॅड. रूपेश पाटील, सचिव गौरव महाले, सहप्रांतपाल नितीन अहिरराव, आरिफ शेख आदी उपस्थित होते. या वेळी प्रा. आंधळे म्हणाले की, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना खूप शिकवले पाहिजे. शिक्षकांनी शिक्षणावर प्रेम केले पाहिजे. मुलांना घडवण्यासाठी न्याय दिला पाहिजे. शिक्षकांनी आपल्या शब्दांकडे, उच्चाराकडे लक्ष दिले पाहिजे. अलीकडे बरेच शिक्षक शाळेत अहिराणी बोलतात, हे चुकीचे आहे, अशी खंत आंधळे यांनी व्यक्त केली.

चाराेळ्यांनी रंगत
रोटरीने सुंदर कार्यक्रम घेतला आहे. चोपड्यातील रोटरीचा कार्यक्रम म्हणजे मी आंधळा (आंधळे), असलो तरी याची देही याची डोळा अनुभवला, याचा आनंद आहे. असे प्रा. आंधळे यांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला. कवी आंधळे यांनी याप्रसंगी विविध कविता, चारोळ्या ऐकवून कार्यक्रमात रंगत आणली.

यांना मिळाले पुरस्कार... रोटरी क्लबतर्फे नेशन बिल्डर अवॉर्ड देवून देविदास महाजन, प्रवीण पाटील, संजय पाटील, अजिज खान, शीला देशमुख, राजश्री पवार, जगदीश महाजन, किरण पाटील, भास्कर पाटील, आशा पाटील, सुजाता पाटील, ज्ञानेश्वर निकम, मधुकर भोई, किरण पाटील, भारती पाटील, डॉ. सोनल पाटील यांना गौरवण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...