आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोटरी क्लबतर्फे मोहिम:चाेपड्यात रोटरी क्लबतर्फे मोहिमेत गणेश मंडळांना निर्माल्य संकलन बाॅक्सचे वितरण

चोपडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशोत्सवादरम्यान होणारे जलप्रदूषण कमी करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ चोपडातर्फे निर्माल्य संकलन अभियान राबवण्यात आले. शहरातील १० गणेश मंडळांना निर्माल्य संकलन बॉक्स देऊन या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. विसर्जनाच्या दिवशी हे सर्व निर्माल्य बॉक्स गोळा केले जाणार आहेत.

त्यानंतर चोपडा नगर परिषद सोबत मिळून या निर्माल्याचे कंपोस्ट खत तयार केले जाईल. तसेच निर्माल्यापासून तयार झालेल्या या खताचा वापर सार्वजनिक उद्यानात केला जाणार आहे. निर्माल्य संकलन बॉक्स वाटप करताना रोटरीचे अध्यक्ष ॲड. रूपेश पाटील, सचिव गौरव महाले, प्रकल्प प्रमुख संजय शर्मा, एम. डब्ल्यू. पाटील, व्ही. एस. पाटील, धीरज अग्रवाल, महेंद्र बोरसे, चंद्रशेखर साखरे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...