आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेचे‎ दुर्लक्ष:दुभाजकांनी फुलवले सौंदर्य, काटेरी झुडपे कायम‎

भुसावळ‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील यावल रोडवर‎ पालिकेने नवीन दुभाजकांची‎ कामे केली. रंगरंगोटी करुन‎ प्रबोधनात्मक चित्रे काढली.‎ यामुळे सौंदर्यात भर पडली. मात्र,‎ या दुभाजकांमध्ये वाढलेल्या‎ काटेरी झुडपांकडे पालिकेने‎ दुर्लक्ष केले आहे. परिणामी‎ सौंदर्यीकरणाच्या कामावर पाणी‎ फेरले आहे. रस्त्याने ये-जा‎ करणाऱ्या वाहन चालकांना या‎ झुडपांचा त्रास होतो.‎ शहरातील जळगाव, यावल व‎ जामनेर रोड या रस्त्याच्या‎ दुभाजकांच्या कामांसाठी‎ पालिकेने कोट्यवधी रुपयांचा‎ निधी उपलब्ध करुन दिला. या‎ निधीतून गांधी पुतळा ते वन‎ विभागाच्या तपासणी‎ नाक्यापर्यंतच्या दुभाजकांचे‎ नूतनीकरण झाले. नवीन‎ दुभाजकांवर आकर्षक रंगरंगोटी‎ करून स्वच्छता, शिक्षण,‎ आरोग्य आदींबाबत संदेश देणारी‎ चित्रे काढण्यात आली. यामुळे‎ यावल रोडच्या सौंदर्यात भर‎ पडली. पण, या दुभाजकांमध्ये‎ काटेरी झुडपे वाढल्याने‎ वाहनधारकांना त्रास सहन‎ करावा लागतो.‎

यावल रोडवरील नवीन रंगरंगोटी केलेल्या‎ दुभाजकांमध्ये काटेरी झुडपे तशीच आहेत.‎ शोभिवंत फुलझाडे हवी‎ साैंदर्यीकरणासाठी पालिकेला या‎ नवीन दुभाजकांमध्ये शोभिवंत‎ फुलझाडांची लागवड करावी‎ लागेल. दुभाजकांची स्वच्छता व‎ रंगरंगोटी झाल्यानंतर पालिकेने‎ जळगाव, यावल व जामनेर‎ रोडवर ही उपाययोजना केल्यास‎ शहराच्या सौंदर्यीकरणात भर‎ पडेल. पण, हे काम हिवाळ्यात‎ करावे लागेल. कारण,‎ उन्हाळ्यात तापमानामुळे‎ कोवळी फुलझाडे टिकाव‎ धरणार नाहीत.‎

शोभिवंत फुलझाडे हवी‎ साैंदर्यीकरणासाठी पालिकेला या‎ नवीन दुभाजकांमध्ये शोभिवंत‎ फुलझाडांची लागवड करावी‎ लागेल. दुभाजकांची स्वच्छता व‎ रंगरंगोटी झाल्यानंतर पालिकेने‎ जळगाव, यावल व जामनेर‎ रोडवर ही उपाययोजना केल्यास‎ शहराच्या सौंदर्यीकरणात भर‎ पडेल. पण, हे काम हिवाळ्यात‎ करावे लागेल. कारण,‎ उन्हाळ्यात तापमानामुळे‎ कोवळी फुलझाडे टिकाव‎ धरणार नाहीत.‎

बातम्या आणखी आहेत...