आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टर थांबेनात:रात्री डॉक्टर कजगावात थांबेनात; रुग्णांचे हाल

कजगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रात्रीच्या वेळी डॉक्टर गावात थांबत नसल्याने येथील रुग्णांची गैरसोय होत आहे. रात्री अपरात्री काेणाची प्रकृती बिघडली तर उपचार मिळत नाही. अशावेळी रुग्णास घेऊन चाळीसगाव गाठावे लागते. परंतु त्यातही पैसे व वाहनाची साेय करावी लागते. त्यात वेळ जाताे.

कजगावात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. पण रात्रीच्या वेळी कोणीही जबाबदार डॉक्टर या ठिकाणी थांबत नाही. यामुळे रात्री अपरात्री कोणाची प्रकृती बिघडली किंवा काही अपघात झाला तर उपचार मिळणे अशक्य हाेते. अशावेळी रुग्णांना चाळीसगाव घेऊन जावे लागते. वेळेत उपचार न भेटल्याने अनेक रुग्णांनी जीव गमावल्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. जे काही डॉक्टर गावात थांबतात ते रात्रीच्या वेळी रुग्णांना तपासत नाहीत, अशी तक्रार भूषण पाटील यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...