आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पूर्णपात्रे कनिष्ठ महाविद्यालयात मुलींचे वर्चस्व ; शास्त्र विभागाचा 100 टक्के तर कला विभागाचा 94.65 टक्के लागला निकाल

चाळिसगांव22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भडगाव | येथील कनिष्ठ महाविद्यालयातील शास्त्र विभागाचा १०० टक्के तर कला विभागाचा ९४.६५ टक्के निकाल लागला आहे. शास्त्र विभागात वृषांक अजय अहिरे (९०%) प्रथम, रिया जयदीप राजपूत (८८.६७) द्वितीय तर संघवी सुजल प्रशांत (८७.८३%) तृतीय आली आहे. तर कला शाखेत निर्मल विजय अहिरे (८१.८३%), प्रथम ओम रमेश महाजन (८०.१७%) तर वैभव बापूराव जाधव व जयश्री भगवान सोनवणे (७८.८३%) हे दोघे तृतीय आले आहेत. सर्व गुणवंतांचे संस्थेचे अध्यक्ष दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ, व्हॉइस चेअरमन व्ही. टी. जोशी, स्थानिक चेअरमन दत्तात्रय पवार, कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन विनय जकातदार, किमान कौशल्य विभागाचे चेअरमन विजय देशपांडे, प्राचार्य विश्वासराव साळुंखे, उपप्राचार्य संदीप सोनवणे, उपमुख्याध्यापक के. एस. पाटील, पर्यवेक्षक अरुण पाटील व एस. एम. पाटील तसेच सर्व शिक्षक, कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.

भडगाव | येथील आदर्श कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील बारावी विज्ञान शाखेचा १०० टक्के तर कला शाखेचा ९७.३३ टक्के निकाल लागला असून विद्यार्थ्यांनी उज्वल यशाची परंपरा राखण्यात यश मिळवले आहे. विज्ञान शाखेत श्रुती बापू सोनार (८६.६७%) प्रथम, श्रुती उदय देशमुख व देवयानी विश्वनाथ घटे (८५.६७) द्वितीय तर तेजल अशोक सोनार (८५.३३) तृतीय आली आहे. तर उत्कर्षा वासुदेव महाजन व जान्हवी बिपिन अहिरे यांनी अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक मिळवला आहे. कला शाखेत अक्षदा जगदीश देवरे (८३.८३) प्रथम, तन्वी संजय भोई (८३) द्वितीय तर पायल किशोर चव्हाण (८०) तृतीय आली आहे. तर काजल दिलीप पवार व तनुजा देविदास महाजन यांनी चौथा व कोमल बाबाजी पाटील आणि भूमिका देवसिंग महाले या दोघांनी पाचवा क्रमांक पटकावला आहे. सर्व गुणवंत विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष एकनाथ महाजन, मानद सचिव दीपक महाजन, उपाध्यक्ष विजय महाजन, प्राचार्य एस. पी. रोकडे, पर्यवेक्षक विलास महाजन, जी. टी. माळी, व शिक्षक, कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.

बातम्या आणखी आहेत...