आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविविध कार्यकारी सहकारी सोसायटी वाघळी सामील गाव डामरूण येथे लोकसहकार व नम्रता पॅनलमध्ये लढत झाली. लोकसहकार पॅनलने आठ जागा जिंकून सत्ता मिळवली.
कर्जदार खातेदार गटातून सुरेश बळीराम सोनवणे, अनिल उत्तम पाटील, प्रभाकर अण्णा सुतार, संजय बळीराम भंगाळे, एन.टी.प्रवर्गातून अविनाश सुभाष हाडपे, ओबीसी गटातून दादाभाऊ नामदेव माळी तर महिला संवर्गातून भारती नकुल चौधरी यांनी विजय मिळवला. २ रोजी चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक झाली. चेअरमनपदी सुरेश बळीराम सोनवणे यांनी चंद्रकांत एकनाथ भोळे यांचा ८ विरुद्ध ५ मतांनी पराभव केला.
तर व्हाईस चेअरमनपदासाठी अनिल उत्तम पाटील यांनी द्वारकाबाई हिरामण चौधरी ह्यांचा ८ विरुद्ध ५ मतांनी पराभव केला. डामरूण येथील प्रतिनिधीची प्रथमच व्हाईस चेअरमनपदी निवड झाली. लोकसहकार पॅनलचे नेतृत्व अभय सोनवणे व रावसाहेब सोनवणे यांनी केले. नम्रता पॅनलचे नेतृत्व जि. प. सदस्य तथा माजी शिक्षण सभापती पोपट भोळे यांनी केले. चंद्रकांत भोळे हे पोपट भोळे ह्यांचे लहान बंधू आहेत. कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.