आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएरंडोल तालुक्यातील आडगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात सहकार पॅनलने १३ पैकी १२ जागांवर तर शेतकरी पॅनलने एकाच जागेवर विजय मिळवला. त्यामुळे या सोसायटीवर सहकार पॅनलने वर्चस्व राखल्याचे स्पष्ट झाले.
आडगाव येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या १३ जागांसाठी रविवारी मतदान घेण्यात आले. त्यानंतर लगेच मतमोजणी करण्यात आली. या निवडणुकीत सहकार पॅनल विरुद्ध शेतकरी पॅनलमध्ये लढत होती. सहकार पॅनेलचे नेतृत्व सुदाम पाटील, मोहनदास महाजन, प्रल्हाद साबळे यांनी तर शेतकरी पॅनेलचे नेतृत्व डॉ. प्रवीण वाघ, भागवत महाजन, निंबा पाटील, धीरज पाटील यांनी केले. संस्थेच्या ७५२ सभासदांपैकी ६५४ सदस्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. डी. पाटील यांनी काम पाहिले. त्यांना सोसायटीच्या इतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. निकाल जाहीर होताच गावात विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलाल उधळून जल्लोष साजरा केला. सहकार पॅनलच्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे ग्रामस्थांसह परिसरातून सर्वत्र कौतुक केले जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.