आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाझ्या नादी लागू नका. मी साधा माणूस नाही. संजय राऊत सारख्यांना मी घाम फोडतो. तर, बाकीचे कुठे, अशा शब्दांत शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाच्या जळगावमधील पदाधिकाऱ्यांना इशारा दिला. दोनगाव (ता. धरणगाव) येथे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. मी बारक्यांच्या नादी लागत नाही, असा खोचक टोलाही त्यांनी ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना लगावला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार मंगेश चव्हाण होते. व्यासपीठावर जिल्हा बँकेचे संचालक संजय पाटील, ज्येष्ठ पदाधिकारी आर. डी. पाटील, के. आर. पाटील, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख पी. एम. पाटील, तालुकाप्रमुख गजानन पाटील, राजेंद्र चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, विक्की पाटील, पं. स. सभापती प्रेमराज पाटील, मुकुंदराव नन्नवरे, रवींद्र चव्हाण, फुलपाटचे सरपंच हरिभाऊ पाटील, उपसरपंच दत्तू पाटील, भिकन पाटील, किरण पाटील, सुनील पाटील, टहाकळीचे सरपंच दीपक चव्हाण, उपसरपंच किरण पाटील, मधू पाटील, अशोक पाटील, बंडू पाटील, प्रमोद पाटील, डी. ओ. पाटील, धरणगावचे पप्पू भावे, विलास महाजन, भटू पाटील, सोसायटीचे चेअरमन किशोर पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, माजी सरपंच सुरेश पाटील, महिला संपर्क प्रमुख सरिता माळी, प्रिया इंगळे, भारती चौधरी, पुष्पा पाटील, सुधाकर पाटील, गोकुळ लंके, डॉ. कमलाकर पाटील, चेतन पाटील, शरद पाटील, पंकज पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन भास्कर पाटील यांनी तर किशोर पाटील यांनी आभार मानले.
या कामांचे झाले लोकार्पण व भूमिपूजन ... दोणगाव, टहाकळी व फुलपाट येथील सुमारे ९ कोटींच्या विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन पालकमंत्र्यांनी केले. यात दाेनगाव येथे पाळधी रस्ता मजबूत व विस्तारीकरणासाठी २.५ कोटी, कानळदा रस्ता डांबरीकरणासाठी १ कोटी, शेरी रस्ता डांबरीकरण १.१० कोटी, पथराड रस्ता डांबरीकरण ३० लाख, खेडी रस्ता खडीकरण ३० लाख, शाळेला संरक्षक भिंत २७ लाख, साठवण बंधारा ३५ लाख, व्यायाम शाळा बांधणे १० लाख या कामांचे लोकार्पण केले. तर दोनगाव बुद्रुक येथे पाणीपुरवठा योजनेसाठी ८५ लाख व ४९ लाख, संरक्षक भिंत बांधण्यासाठी १० लाख, फुलपाट येथे पाणीपुरवठा योजनेसाठी १७ लाख, पेव्हर ब्लॉक बसवणे व संरक्षक भिंत बांधणे १५ लाख तर टहाकळी येथे पाणीपुरवठा योजनेसाठी ६१ लाख, पेव्हर ब्लॉक बसवणे व साठवण बंधाऱ्यासाठी १५ लाख अशा विविध कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
बारक्यांच्या नादी लागत नाही...
काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली होती. त्याला भरसभेत प्रत्युत्तर देताना गुलाबराव पाटील यांनीही खोचक प्रत्युत्तर दिले. माझ्या नादी काय लागता. मी बारक्यांच्या नादी लागत नाही. संजय राऊतांसारख्या माणसाला मी घाम फोडतो. विधानसभेच्या सभागृहात नुसता उभा राहिलो तर समोरच्याला प्रश्न पडतो भाऊ काय बोलणार आहे, असेही ते म्हणाले.
शरद पवारांना प्रत्युत्तर
कसबा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यावरून शरद पवारांनी भाजपवर टीका केली आहे. तसेच, लोकांना आता बदल हवा आहे, असेही शरद पवार म्हणाले. यावर मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, नागालँड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे ७ आमदार निवडून आल्यामुळे शरद पवार नक्कीच आनंदी असतील. मात्र, त्यामुळे राज्यातही सत्ता परिवर्तन होईल, असे म्हणणे चुकीचे आहे. प्रत्येक राज्याचे गणित वेगवेगळे असते. त्यामुळे एका निवडणुकीवरून पुढील निवडणुकीचा अंदाज बांधता येऊ शकत नाही, असे ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.