आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील वाघळी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या घरात मुक्काम केला, तसेच गावातील ज्या विहिरीचे पाणी त्यांनी प्राशन केले होते, ते घर आणि विहीर जतन केले जाणार आहेत. त्यासाठी बीडीओ नंदकुमार वाळेकर यांच्या प्रयत्नातून वित्त आयोगाच्या निधीतून सुमारे दीड लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या घराचे आणि विहीरीच्या पुनरूज्जीवनाच्या कामाला महापरिनिर्वाणदिनीच प्रारंभ झाला. या कामासाठी ५ ते ७ लाखांचा निधी लागणार आहे. हा निधी लोकसहभागातून उभारण्यात येणार आहे.
राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ८४ वर्षांपूर्वी वाघळी गावात, आताच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे एक दिवस मुक्काम केला होता. तसेच त्या ठिकाणी असलेल्या विहिरीवर आंघोळ केली होती. ती विहीर जतन राहण्यासाठी तसेच डॉ.आंबेडकर ज्या खोलीत थांबले होते त्या खोलीचे पुनरूज्जीवन करून स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नवीन पिढीला त्यांच्या विचारांची प्रेरणा मिळणार आहे. यासाठी बीडीओ वाळेकर यांनी सुमारे दीड लाख रूपयांचा निधी मंजूर करून आणला आहे.
महापरिनिर्वाण दिनी या स्मारकाच्या कामाला मान्यवरांच्या उपस्थितीत कुदळ मारून सुरूवात करण्यात आली. यावेळी सहाय्यक बीडीओ के.एन.माळी, ग्रामविकास अधिकारी जितेंद्र लोणीया, सरपंच पुत्र सुनील धनगर, ग्रामपंचायत सदस्य राजू हाडपे, विकास चौधरी, मालताबाई केदार यंाच्यासह गिरीश बऱ्हाटे व ग्रामस्थ उपस्थित होते.
या काळात मुक्काम : दि.१७ ते १९ जून १९३८ या काळात डॉ. बाबसाहेब आंबेडकर हे खान्देश दौऱ्यावर आले होते. त्यावेळी खान्देशचे पहिले आमदार डी.जी.जाधव यांच्या प्रचारासाठी ते वाघळी येथे आले होते. त्यावेळी त्यांनी मुक्काम केला होता. वाघळी येथे त्यांनी चावडी, प्राथमिक शाळेचा आढावा घेतला होता.
स्मृती राहणार चिरंतन
वाघळी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भेट अविस्मरणीय आहे. त्या स्मृती चिरंतन राहाव्यात यासाठी स्मारक उभारले जाणार असून त्या विहीरीचेही पुनरूज्जीवनाचे काम सुरू झाले आहे. - नंदकुमार वाळेकर, बीडीओ, चाळीसगाव
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.