आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रींची स्थापना:एरंडाेलला 34 वर्षांपासून डॉ. के. ए. बोहरी यांच्याकडे होतेय श्रींची स्थापना

एरंडोलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

धर्माच्या भिंती दूर करून शहरातील प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक डॉ. के. ए. बोहरी यांच्याकडे जवळपास ३४ वर्षांपासून श्री गणेशाची स्थापना केली जात आहे. राष्ट्रीय एकात्मतेचे आणि सर्वधर्म समभावाचे ज्वलंत उदाहरण म्हणून डॉ. बोहरी यांच्याकडील गणपती उत्सवाकडे पाहिले जाते.

शहरातील प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक डॉ. के. ए. बोहरी यांच्याकडे त्यांचे पूत्र डॉ. फरहाज बोहरी यांनी लहानपणी अर्थात जवळपास ३४ वर्षांपूर्वी श्री गणेशाची स्थापना केली होती. त्यानंतर सलग ३४ वर्षांपासून डॉ. बोहरी यांच्या रुग्णालयात दरवर्षी नियमितपणे गणपतीची पूर्ण धार्मिक पद्धतीने स्थापना करण्यात येते. रुग्णालयात दररोज सकाळी व सायंकाळी गणपतीची आरती म्हटली जाते.

तसेच अनंत चतुर्थीच्या दिवशी विधिवत पूजा करून विसर्जन केले जाते. या वर्षी डॉ. के. ए. बोहरी, डॉ. जीवन पाठक, निवृत्त शिक्षक नामदेव चौधरी, प्रा. शिवाजीराव अहिरराव, डॉ. फरहाज बोहरी, राजेंद्र चौधरी, समाधान बडगुजर, हेमंत कुलकर्णी, जाकीर शेख व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत गणपतीची स्थापना करण्यात आली. या वेळी शकुंतला अहिरराव, डॉ. एन. के. बोहरी, डॉ. अंबरीन बोहरी यांच्यासह बोहरी परिवारातील सदस्य उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...