आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रम:डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त‎ उद्या चाळीसगाव शहरात गीतांचा सामना‎

चाळीसगाव‎10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब‎ आंबेडकर यांची १३२ वी जयंती‎ १४ एप्रिल रोजी चाळीसगाव येथे‎ साजरी करण्यासाठी स्वाभिमानी‎ जयंती उत्सव समितीची नियोजन‎ बैठक गुरुवारी रात्री ८ वाजता‎ येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर‎ चौकात बैठक पार पडली. यावेळी‎ शहरातील सार्वजनिक‎ स्वाभिमानी जयंती साजरी‎ करण्यासंदर्भात चर्चा हाेऊन‎ निर्णय घेण्यात आला.‎ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या‎ प्रतिमेची मिरवणूक १४ एप्रिल‎ रोजी सायंकाळी काढण्यात येईल.‎

तर दुसऱ्या दिवशी रात्री भीम‎ गीतांचा जंगी सामना हाेणार आहे.‎ या बैठकीच्या अध्यक्षस्थानी‎ डॉ.बाबासाहेब आंबेडकर‎ स्वाभिमानी जयंती उत्सव‎‎‎‎‎‎‎‎‎ समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक‎ धर्मभूषण बागुल तर ज्येष्ठ‎ मार्गदर्शक नगरसेवक रामचंद्र‎ जाधव, राष्ट्रीय सहकारी शिक्षण‎ मंडळाचे संचालक महेश‎ चव्हाण, उद्योजक गौतम झाल्टे,‎ गौतम जाधव, देविदास जाधव,‎ मुकेश नेतकर, उत्सव समितीचे‎ नगरसेवक रोशन जाधव, संभाप्पा‎ जाधव उपस्थित होते.‎

१४ एप्रिल राेजी ८ वाजेपासून‎ अन्नदान केले जाणार असून १५‎ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेपासून‎ प्रसिद्ध गायक समर्थक शिंदे व‎‎‎‎‎‎‎‎‎ रेशमा सोनवणे यांचा भीम‎ गीतांचा जंगी सामना होणार आहे.‎ १३ मार्च रोजी समता सैनिक‎ दलातर्फे सकाळी ९ वाजता‎ शहरातील केंद्रीय कार्यालय‎ भीमालय, सिंधी कॉलनी येथून‎ मोटारसायकल रॅलीचे आयोजन‎ केले आहे. तर १४ एप्रिल रोजी‎ सकाळी ८ वाजता डॉ.बाबासाहेब‎ आंबेडकर चौक येथून‎ मोटारसायकल रॅलीचे आयोजन‎ करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये‎ सहभागाचे आवाहन‎ आयाेजकांनी केले आहे.‎

यंदा हाेणार स्वाभिमानी जयंती साजरी‎ या बैठकीत विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव‎ सालाबादप्रमाणे मोठ्या जल्लोषात व २०१५ मध्ये समाज बांधवांच्या‎ बैठकीत ठरल्याप्रमाणे बाहेरून काेणाकडूनही वर्गणी न घेता समाज‎ बांधवांकडून वर्गणी घेऊन स्वाभिमानी जयंती साजरी करण्यात येणार‎ आहे. मागील वर्षीच्या कार्यक्रमाचा हिशेब आयोजकांनी मांडला.‎ उपस्थित सर्वांनी त्यास अनुमोदन दिले.‎

बातम्या आणखी आहेत...