आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोखंडी पास:भावाने डोक्यात लोखंडी पास मारल्याने मद्यपी भाऊ गतप्राण

​​​​​​​ चाळीसगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मद्यपी लहान भावाच्या सततच्या त्रासाला कंटाळून व पोळ्याच्या दिवशी त्याने शिवीगाळ केल्याने संतप्त सख्या मोठ्या भावाने लहान भावाच्या डोक्यात लोखंडी पास मारल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना २६ रोजी सायंकाळी अभोणे येथे घडली. याप्रकरणी मोठ्या भावास अटक करण्यात आली असून त्यास १ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. शिवाजी तुकाराम पाटील असे ठार झालेल्या भावाचे नाव आहे.

अभोणे येथील सुरेश तुकाराम पाटील व शिवाजी तुकाराम पाटील या भावंामध्ये गेल्या काही दिवसांपासून नेहमी वाद होत. या वादामुळे शिवाजी पाटील हा गेल्या ५ महिन्यांपासून कुटुंबासह कळमडू येथे राहताे. २५ रोजी शिवाजी पाटील हे कळमडू येथून रात्री १० वाजता अभोणे येथे मोठा भाऊ सुरेश पाटील याच्या घरी आले व शिवीगाळ करून मारहाणीची धमकी दिली. त्यामुळे सुरेश, त्याची आई, पत्नी व मुले हे गावातील एका व्यक्तीच्या घरी झोपण्यासाठी गेले. त्यानंतर शिवाजी हा कळमडू येथे गेला.त्यानंतर २६ रोजी सकाळी ७ वाजता शिवाजी हा परत अभोेणे येथे दारू पिवून आला व भाऊ सुरेश यांच्याशी वाद घालू लागला.

शिवाजी याला समजावून सांगूनही तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान सुरेश हा पाेळ्यानिमित्त बैल गावातून मिरवून घरी आला. या वेळी मद्यपी शिवाजीने सुरेशला पुन्हा शिवीगाळ केल्याने संतापलेल्या सुरेशने पूजेकरीता ओट्यावर ठेवलेली लोखंडी पास शिवाजीच्या डाेक्यावर, तोंडावर मारली. नागरिकांनी व मेहुणबारे पोलिसांनी शिवाजी याला ग्रामीण रूग्णालयात नेले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषीत केले. या प्रकरणीत मृताची अाई लताबाई पाटील यांच्या माहितीवरुन गुन्हा दाखल झाला अाहे.

बातम्या आणखी आहेत...