आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिढा कायम:शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बहिष्कारामुळे‎ विद्यापीठाने अखेर परीक्षा पुढे ढकलल्या‎

जळगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यापीठ आणि महाविद्यालयीन‎ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परीक्षांच्या‎ कामांवर टाकलेला बहिष्कार मागे घेवून‎ शासनाला सहकार्य करावे असे आवाहन‎ शासनाच्यावतीने सहसंचालक प्रा. संतोष‎ चव्हाण यांनी केले. मात्र याबाबत‎ राज्यपातळीवर निर्णय घेतल्यावरच‎ आंदोलन मागे घेण्यात येणार असल्याचे‎ कर्मचाऱ्यांनी सांगितले. परिणामी‎ विद्यापीठाने सध्या सुरु असलेल्या परीक्षा‎ पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.‎ राज्यातील अकृषी विद्यापीठीय व‎ संलग्नित महाविद्यालयीन शिक्षकेत्तर‎ कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित‎ मागण्यांसाठी २ फेब्रुवारीपासून परीक्षांच्या‎ कामावर बहिष्कार टाकला. या संदर्भात‎ शिक्षण सहसंचालक प्रा. संतोष चव्हाण‎ यांनी शुक्रवारी विद्यापीठात उमवि‎ कर्मचारी संघटना व मागासवर्गीय‎ कर्मचारी संघटना तसेच महाविद्यालयीन‎ शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना त्यांच्या सर्व‎ पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. कुलगुरू‎ प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, कुलसचिव डॉ.‎विद्यापीठातील कर्मचारी संघटनांसाेबत चर्चा करताना शिक्षण सहसंचालक प्रा. संताेष‎ चव्हाण, कुलगुरू व्ही. एल. माहेश्वरी, कुलसचिव डाॅ. विनाेद पाटील, प्रा. दीपक दलाल.‎

विनोद पाटील व परीक्षा व मूल्यमापन‎ मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. दीपक‎ दलाल यांची या वेळी प्रमुख उपस्थिती‎ होती. विद्यार्थ्यांच्या परीक्षांत व्यत्यय येवू‎ नये. सर्व परीक्षा सुरळीत होवू द्याव्या असे‎ आवाहन प्रा. चव्हाण यांनी केले. त्यावर‎ संघटनांचे प्रतिनिधी अरूण सपकाळे,‎ दुर्योधन साळुंखे, भय्या पाटील, वैशाली‎ वराडे तसेच महाविद्यालयीन संघटनांचे‎ प्रतिनिधी प्रसाद पाटील, विजय पाटील‎ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.‎ कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी या‎ बैठकीत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत‎ शासनाने लक्ष द्यावे आणि विद्यार्थ्यांचे‎ नुकसान होवू नये याकडे कर्मचाऱ्यांनी‎ लक्ष द्यावे असे आवाहन केले.‎ कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी‎ कर्मचारी संघटनांचे आभार मानले.‎

कर्मचाऱ्यांच्या भावना‎ शासनाला सांगाव्या‎ शासनाने प्रलंबित मागण्यांकडे‎ गांभीर्याने बघावे व कर्मचाऱ्यांच्या‎ भावना शासनाच्या कानावर‎ घालाव्या असे आवाहन या‎ प्रतिनिधींनी केले. राज्य विद्यापीठीय‎ व महाविद्यालयीन सेवक संयुक्त‎ कृती समितीकडून हे आंदोलन‎ पुकारले असल्याने जो निर्णय होईल‎ तो राज्यपातळीवर होईल असे‎ संघटना पदाधिकाऱ्यांनी सांगितले.‎

आंदोलनामुळे परीक्षांना स्थगिती... अविष्कार, आव्हान यासोबतच क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविलेल्या ज्या‎ विद्यार्थ्यांच्या परीक्षा बाकी आहेत त्यांच्या परीक्षांना १ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. मात्र, दुसऱ्याच पेपरला कर्मचाऱ्यांनी बहिष्कार‎ टाकला. जळगाव, धुळे, नंदुरबार तिन्ही जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचा यात सहभाग असल्याने सध्या सुरू असलेल्या परीक्षा पुढे‎ ढकलण्यात आली. आंदोलन मागे घेतल्यानंतर नवीन वेळापत्रक जाहीर केले जाणार असल्याचे विद्यापीठातर्फे कळवण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...