आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतूक पाेलिसांची दमछाक‎:जलवाहिनी फुटल्याने पाराेळा‎ शहरात पाण्याची माेठी नासाडी‎

पारोळा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील महामार्ग क्रमांक सहावर‎ अर्जुन टायर या दुकानाच्या खालून‎ गेलेली १३ इंची व्यासाची‎ पाइपलाइन, शनिवारी सायंकाळी‎ ४.३० वाजता अचानक फुटली.‎ त्यामुळे हजारो लिटर पाणी वाहून‎ गेले. या घटनेमुळे शहराचा‎ पाणीपुरवठा एक दिवस विलंबाने‎ होणार आहे.‎ या प्रकारामुळे वाहतूक ठप्प‎ झाल्याने वाहतूक कक्षाच्या‎ पोलिसांना पाचारण करावे लागले.‎ पाइपलाइन फुटण्याचे कारण स्पष्ट‎ झालेल नाही. मात्र, या घटनेमुळे‎ पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची‎ चांगलीच धावपळ उडाली.‎ तासाभराने पुरवठा बंद केल्यानंतर‎ गळती थांबली.

गळतीमुळे‎ दुकानातील साहित्य बाहेर‎ काढण्यासाठी संबंधितांची तारांबळ‎ उडाली. यावेळी नागरिकांनी मोठ्या‎ प्रमाणात गर्दी केली होती. शहरात‎ अगोदरच १२ झोन मध्ये १२‎ दिवसांआड पाणीपुरवठा होतो.‎ मात्र, पाइपलाइन फुटल्यामुळे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ पाणीपुरवठा एक दिवस विलंबाने‎ होईल, असे चित्र होते. शहरातील‎ जीर्ण पाइपलाइन प्रश्न यामुळे‎ चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे‎ शासनाच्या ५४ कोटी निधीतून‎ पाइपलाइनचे काम लवकर मार्गी‎ लागावे, अशी अपेक्षा आहे.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ दरम्यान, पाराेळा शहरात जवळपास‎ १२ ते १५ दिवसांनी पाणीपुरवठा हाेत‎ असताे. त्यातच जीर्ण झालेली‎ पाइपलाइनीला गळती लागल्याने‎ पुन्हा उशिरा पाणी मिळेल. त्यामुळे‎ नागरिकांना पाण्यासाठी काही‎ दिवस प्रतीक्षा करावी लागेल.‎

बातम्या आणखी आहेत...