आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरसोय:अमळनेरात सिग्नल यंत्रणेअभावी दिवसभरात अनेकदा होतेय कोंडी

अमळनेर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील धुळे-अमळनेर-चोपडा या मुख्य रस्त्यावरील चौकांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या नवीन नाही. या चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा नसल्याने दिवसभरात अनेकदा वाहतुकीचा खोळंबा होतो. त्यामुळे चौकांमध्ये प्रशासनाने सिग्नल यंत्रणा उभारल्यास ही समस्या सुटू शकते. वाहतूक कोंडीमुळे अपघाताचा धोका वाढतो. त्यामुळे प्रशासनाने दखल घेणे गरजेचे आहे.

शहरातून जाणाऱ्या धुळे रस्त्यालगत बाजार आणि शाळा असल्याने, सोमवारी बाजाराच्या दिवशी आणि शाळा भरण्याच्या-सुटण्याच्या वेळेत प्रमुख चौकांमध्ये वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. या रस्त्यावर पैलाड चौफुली, दगडी दरवाजा, पाच पावली देवी, पन्नालाल चौक, बसस्थानक, सुदीप मेडिकल जवळ, शासकीय विश्रामगृह, अरिहंत मेडिकल जवळील चौकांत नेहमी वाहतुकीचा बोजवारा उडालेला दिसून येतो. या रस्त्यावर माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या विकास निधीतून, आर.के.नगर पासून ते पन्नालाल चौकापर्यंत दुभाजक उभारण्यात आले आहेत.

तसेच दुतर्फा फुटपाथही तयार केले आहेत. रस्त्यावर या सुविधा निर्माण झाल्यामुळे वाहतूकला शिस्त लागत असली, तरी मुख्य चौकात सिग्नल यंत्रणा नसल्याने वाहतुकीची कोंडी होते. अनेकदा यामुळे अपघातही घडतात. बाजाराच्या दिवशी तर वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागतो. या रस्त्यावर ग्रामीण भागातून येणाऱ्या रिक्षा आणि अवजड वाहनांना बसस्थानकासमोरून वळता येते. मात्र, काही वाहनधारक चौकातूनच वाहने वळतात. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते.

या ठिकाणी होतो खोळंबा
दगडी दरवाजा चौक, पन्नालाल चौक, पाचपावली देवी चौक, सुदीप मेडिकल जवळी चौक, शासकीय विश्राम गृहासमोरील चौक, अरिहंत मेडिकल समोरील चौक ही जास्त वर्दळीची ठिकाणे आहेत. याचा ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झाल्यास पोलिसांचे श्रम वाचतील आणि वाहतुकीला शिस्त लागेल. तसेच होणारे लहान-मोठे अपघातही थांबतील.

...तर वाहतुकीला शिस्त लागेल
धुळे रस्त्यावर प्रचंड वाहतूक असल्यामुळे अनेकदा चौकांमध्ये अपघात होतात. आजही चौकात सिंगल यंत्रणा नसल्याने वाहनचालक बेशिस्तपणे वाहने चालवतात. त्यामुळे होणाऱ्या अपघातात शालेय विद्यार्थी आणि महिला वाहनचालक जखमी होतात. म्हणून सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झाल्यास त्याचा निश्चितच फायदा होईल. -विजय पाटील, नागरिक, अमळनेर

सिग्नलचे खांब गायब
पूर्वी या स्त्यावर दुभाजक आणि फुटपाथची उभारणी करण्यापुर्वी बस स्थानकाजवळ आणि पन्नालाल चौकात सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली होती. मात्र सिग्नल यंत्रणेचे केवळ खांब उभे होते. ही यंत्रणा कधीही कार्यान्वित झाली नाही. सध्या सिग्नल यंत्रणेचे खांबदेखील चौकातून गायब झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...