आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ शिवप्रेमी संघटना व सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने चाळीसगाव बंदची हाक दिली होती. त्याला शहरातून प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आज दिवसभर शहरातील दुकाने बंद दिसून आली.प्रारंभी शिवप्रेमी संघटना व सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने रेल्वे स्टेशनपासून रॅलीला सुरुवात करण्यात आली. तेथून रॅली निघून स्टेशन रोडने तहसील कार्यालय, बाजार पेठ, सराफ बाजार, मुसा कादरी बाबा चौक, तेथून नागद रोडने घाट रोड मार्गे ए. बी. हायस्कूलपर्यंत तसेच करगाव रोड मार्गे भडगाव रोड, वरून गणेश रोड, छत्रपती शिवाजी चौक तेथून तहसील कार्यालयात आल्यानंतर रॅलीची सांगता करण्यात आली.
या चाळीसगाव बंदमध्ये लक्ष्मण शिरसाठ, गणेश पवार, धर्मभूषण बागुल, ॲड. राहुल जाधव, वर्धमान धाडीवाल, अरविंद पाटील, खुशाल मराठे, अरुण पाटील, खुशाल बिडे, संजय कापसे, छोटू अहिरे, महेंद्र जैस्वाल, शैलेंद्र सातपुते, रामेश्वर चौधरी, किरण आढाव, स्वप्निल जाधव, अविनाश काकडे, गोकुळ पाटील, चंद्रकांत ठाकरे, सतीश पवार, प्रमोद वाघ, ज्ञानेश्वर कोल्हे, अनिल कोल्हे, डॉ. रवी चव्हाण, मुकुंद पाटील, गोकुळ पाटील, सविता कुमावत, तुषार निकम, ॲड. ईश्वर जाधव, रमेश शिंपी, सुधाकर मोरे, वसंत मरसाळे, सागर निकम, आर. बी. जगताप, गोविंदा चव्हाण, भाऊसाहेब सोमवंशी, भैयासाहेब पाटील, भरत नवले, सचिन स्वार, स्वप्निल गायकवाड आदींनी सहभाग घेत रॅलीत उपस्थिती दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.