आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेशाने मोठा दिलासा:143 क्विंटल कपाशी चोरी झाल्याने मोबदल्यात शेतकऱ्यांना ट्रकचा ताबा

पहूर3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथून जवळच असलेल्या शेरी ( ता. जामनेर) येथील काही शेतकऱ्यांचा कापूस, ट्रकद्वारे गुजरातमध्ये विक्री साठी पाठवला होता. हा ट्रक ११ महिन्यांपुर्वी बेपत्ता झाला होता. या प्रकरणी पहूर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ट्रकसह चालकाला ताब्यात घेतले. तसेच जामनेर न्यायालयाच्या आदेशाने चालकाने चोरी केलेल्या कापसाच्या किमतीच्या मोबादल्यात शेतकऱ्यांना ट्रकचा ताबा देण्यात आला. शेरी येथील धर्मराज शांताराम पाटील यांच्यासह तीन शेतकऱ्यांनी १९ नोव्हेंबर २०२१ पुर्वी, धांदुका (गुजरात) येथे १२ लाख रुपये किमतीचा १४३ क्विंटल कापूस विक्रीसाठी ट्रकने (जी.जे.०९-झेड.२९१४) पाठवला होता.

परंतु ट्रक सांगितलेल्या जिनिंगमध्ये गेलाच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी माहिती घेतली असता ट्रकचालक कापूस घेऊन पसार झाल्याचे निष्पन्न झाले होते. याप्रकरणी धर्मराज पाटील यांनी ट्रकचालक आशीषभाई रमणीकभाई हिंगराजिया (रा.राजकोट) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपास करून ट्रक चालकासह ट्रक व तीन लाखांची रक्कम ताब्यात घेतली. जामनेर न्यायालयाने कापसाच्या मोबादल्यात रोख ३ लाख व ट्रक शेतकरी धर्मराज पाटील यांच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले.

बातम्या आणखी आहेत...