आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:अमळनेरात मंत्री अब्दुल सत्तार यांचा पुतळा जाळला; वक्तव्याचा निषेध

अमळनेर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या टीकेचे, अमळनेरात सोमवारी सायंकाळी प्रतिसाद उमटले. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वात सत्तार यांच्या निषेधाच्या घोषणा देत मोर्चा काढला. तसेच महाराणा प्रताप चौकात मंत्री सत्तार यांच्या पुतळ्याला जोडे मारत त्याचे दहन केले.

सिल्लोड येथे माध्यमांशी बोलतांना मंत्री सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली. त्यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध केला.यावेळी राष्ट्रवादी नेत्या तिलोत्तमा पाटील, रंजना देशमुख, रिता बाविस्कर, जयश्री पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्षा मंदाकिनी देशमुख, आशा चावरिया, तालुकाध्यक्ष सचिन पाटील, एल.टी.पाटील, राजेश पाटील, मुख्तार खाटीक, गौरव पाटील, देविदास पाटील, अशोक पवार, डॉ.रामू पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलकांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा निषेध करत घोषणाबाजी केली.

बातम्या आणखी आहेत...