आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध कार्यकारी सोसायटी:बिनविरोधचे प्रयत्न अखेर फोल चाळीसगाव विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक गाजणार ; जिल्हा बँक संचालकांच्या पॅनलमध्ये लढत

चाळीसगाव19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या तसेच ‘अ’ वर्ग दर्जा असणाऱ्या चाळीसगाव विविध कार्यकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोधचे करण्याचे प्रयत्न अखेल फोल ठरले आहेत. बिनविरोधची शतकीय परंपरा असलेल्या या सोसायटीच्या १३ जागांसाठी एकूण २६ उमेदवार रिंगणात आहेत. आमदार मंगेश चव्हाण व जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप देशमुख यांच्या पॅनलमध्ये समोरासमोर झुंज रंगणार आहे. त्यामुळे स्थापनेच्या १०३ वर्षांपासून आतापर्यंत बिनविरोध असलेल्या संस्थेची निवडणूक यंदा प्रथमच गाजणार आहे. तालुक्यातील दोन दिग्ग्ज या निवडणुकीत आमने-सामने आल्याने सर्वांचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. चाळीसगावसह ओझर, कोदगाव, टाकळी प्र.चा. या गावातील एकूण ८५३ सभासद संख्या असलेल्या चाळीसगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. एकूण १३ जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत तब्बल ५० उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीत त्यात ३ अर्ज बाद झाले. तर माघार काळात २३ अर्ज माघारी घेतल्याने १३ जागांसाठी आता २६ उमेदवार रिंगणात आहेत. अनेक दशकांपासून प्रदीप देशमुख यांचे होते वर्चस्व चाळीसगाव विकासोची सन १९१९मध्ये स्थापना झाली. गत १०३ वर्षांच्या काळात या संस्थेत एकदाही निवडणूक झालेली नाही. बिनविरोध निवड प्रक्रिया पार पडते. गेल्या अनेक दशकांपासून चाळीसगाव विकासोवर जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप देशमुख यांचे वर्चस्व आहे. यंदा, मात्र आमदार मंगेश चव्हाण यांनी सोसायटीच्या निवडणुकीत रस घेतल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे. निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. एकूण १३ जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत तब्बल ५० उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीत त्यात ३ अर्ज बाद झाले. तर माघार काळात २३ अर्ज माघारी घेतल्याने १३ जागांसाठी आता २६ उमेदवार रिंगणात आहेत. शेतकरी सहकार विकास पॅनलचे हे उमेदवार आहेत रिंगणात कर्जदार खातेदार प्रतिनिधी साहेबराव भिकन आगोणे, प्रदीप रामराव देशमुख, कमलाकर उखा गुजर, प्रदीप देवराव देशमुख, परशुराम भिकन महाले, अंबू बुधा पाटील, अनंतसिंग देवसिंग पवार, प्रवीण कनकसिंग राजपूत, इतर मागासवर्ग गटात महेंद्र जगन्नाथ पाटील, महिला राखीव अनिता भिकन गुजर, कविता सतीश महाजन, अनुसूचित जाती जमाती गटात मिलींद नामदेव जाधव, विमुक्त जाती जमाती गटात देविदास एकनाथ अगोणे. भाजपप्रणित जन-परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांमध्ये यांचा आहे समवेश कर्जदार खातेदार प्रतिनिधी गटात संजय भगवान चौधरी, राजेंद्र सिद्धाप्पा गवळी, पंडीत भागा गुजर, संतोष गोविंदा गुजर, खान अकबर खा समशेर खान नाल्वन, आधार काशीनाथ पाटील, रामदास शंकर पाटील, भरतसिंग शालीवान राजपूत, इतर मागासवर्ग गटात शेषराव रामराव पाटील, महिला राखीव गटात यशोदा ओंकार घेवरे, गंगुबाई नामदेव गुजर, अनुसूचित जाती जमाती गटात हिरामण धुडकू गांगुर्डे, विमुक्त जाती जमाती गटात भाऊसाहेब बाबू जाधव. दोन्ही गटात झाले नाही एकमत बिनविरोधची परंपरा खंडित होवू नये म्हणून अनेक प्रयत्न झाले. आमदार मंगेश चव्हाण यांच्या गटाने १३ पैकी काही जागांवर दावा करत मागणी केली होती. मात्र, त्यावर दोन्ही गटात एकमत झाले नाही. माघारीसाठी शेवटपर्यंत खल करून ही सर्व प्रयत्न फोल ठरल्याने अखेर निवडणूक लागली. आमदारांचे जन-परिवर्तन पॅनल व प्रदीप देशमुख यांच्या शेतकरी सहकार विकास पॅनलमध्ये थेट लढत होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...