आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजेत्या पथकांना दिली जाणार हजाराेंची पारिताेेषिके:चाळीसगावात यंदा गाेविंदांचे आठ थर; दोन वर्षांनंतर उत्साहाला येणार उधाण

चाळीसगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या सावटामुळे दहीहंडी उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा झाला. मात्र यंदा कोरोनाचे सावट कमी झाल्याने हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार आहे. शुक्रवारी गोपाळकाला होणार असून या वेळी शहरात विविध ठिकाणी दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा गोविंदांच्या उत्साहाला उधाण आले असून विजेत्या पथकांना हजाराे रुपयांची पारिताेेषिके दिली जाणार आहेत. दरम्यान गोविंदांना रात्री दहा वाजेच्या आतच दहीहंडी फोडावी लागणार असून १४ वर्षाच्या आतील बाल गोविंदांना मनाई असणार आहे. यंदा निर्बंध मुक्त वातावरणात विविध मंडळांद्वारे उत्सव रंगणार असून अगदी पाच ते आठ थर मंडळांकडून लावले जाणार आहेत.

दहीहंडीच्या जल्लोषाला दहा वाजेची मर्यादा; बंदाेबस्त तैनात
शहरात तीन ठिकाणी शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता दहीहंडीचा थरार रंगणार असल्याने चाळीसगाव शहर पोलिस देखील अलर्ट आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पाेलिस निरीक्षक के.के. पाटील यांच्या मार्गदर्शनात तगडा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी ५ अधिकारी, ३५ पोलिस कर्मचारी, ४० हाेमगार्ड तसेच जळगाव येथील आरसीपी प्लाटून तैनात असेल. वाहतूक कोंडी टाळण्यासाठीही शहर वाहतूक शाखेच्या वतीने सपाेनि तुषार देवरे यांच्या मार्गदर्शनात २० कर्मचाऱ्यांनी नियोजन केले आहे. दहीहंडी कार्यक्रमात सहभागी गोविंदांनी हेल्मेट घालणे आवश्यक असून आयाेजकांनी जमिनीवर खाली मॅट ठेवणे आवश्यक असल्याच्या सूचना पोलिस प्रशासनाने यापूर्वीच आयाेजक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

मंडळांकडून हाेणार बक्षिसांची लयलूट
खासदार उन्मेष पाटील मित्र मंडळाच्या वतीने यंदाही दहीहंडीचा उत्सव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज (सिग्नल) चौकात होणार आहे. या दहीहंडीत ७५ हजार रुपयांचे बक्षीस आहे. या मंडळाचे यंदाचे पाचवे वर्ष आहे. मोरसिंगभाई राठोड मित्र मंडळ व पंचम ग्रुपच्या वतीने यंदाही घाट रोड, दयानंद कॉर्नर येथे दहीहंडीचे आयाेजन केले आहे. प्रथम बक्षिस २१ हजार १ रूपये, द्वितीय ११ हजार १११ रुपये तर तृतीय बक्षिस ७ हजार १ रूपये असे आहे. शहर पाेलिस स्टेशन, छत्रपती शिवाजी महाराज चौक सिग्नल पॉइंट व घाट रोड दयानंद कॉर्नर येथे दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजकांतर्फे यंदा विक्रमी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

बातम्या आणखी आहेत...