आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादत्तक पुत्राने घेतलेल्या घराचा ताबा वृद्ध दाम्पत्याला देण्यात यावा. तसेच दांपत्याच्या घरात प्रवेश करण्यास दत्तक पुत्राला प्रतिबंध घालण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांनी चोपडा येथील प्रकरणात दिले.
आधार छगन माळी व हिराबाई माळी (रा,शिंदेवाडा, स्वामी समर्थ मंदिराजवळ, चोपडा) यांना मुलबाळ नसल्याने, त्यांनी २०११ मध्ये प्रकाश सुकलाल परदेशी उर्फ रोहित आधार महाजन याला दत्तक घेतले होते. दत्तक प्रक्रियेची कागदपत्रे करून देण्याची व आई-वडिलांची सेवा करण्याची हमी प्रकाश उर्फ रोहितने दिली होती. मात्र २०१७ मध्ये माळी दांपत्याला ज्ञानेश नावाचा मुलगा झाला. त्यामुळे प्रकाश त्याचा द्वेष करू लागला. तसेच मालमत्ता नावावर करण्यासाठी तो जबरदस्ती करत होता. तसेच माळी दांपत्य ज्या घरात राहत होते त्या घरात प्रकाशसह प्रमोद सुकलाल परदेशी, सुकलाल श्यामलाल परदेशी व नंदाबाई सुकलाल परदेशी यांनी बळजबरीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्याला माळी दांपत्याने नकार दिला असता त्यांनी पुंडलिकनगर चोपडा येथे घराचा ताबा घेतला होता.
चोपडा येथील पोलिसांना अंमलबजावणीचे निर्देश प्रकाश व त्याच्या कुटुंबीयांना आधार माळी यांच्या घरात जाण्यास मनाई केली. तसेच दत्तक पत्र रद्द करण्यासाठी दिवाणी न्यायालयात दाद मागावी, असे आदेश प्रांताधिकाऱ्यांनी दिले. चोपडा शहर पोलिस निरीक्षकांनी आदेशची अंमलबाजवणी करावी असेही नमूद केले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.