आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष सहाय्य योजना:कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी वृद्ध, अपंगांची दमछाक ; पाचोऱ्यात साडे अठरा हजार लाभार्थी

पाचोराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विशेष सहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांनी महिनाभरात तहसीलदारांकडूनच २१ हजार रुपये उत्पन्नाचा दाखला, हयातीचे स्वयं घोषणा पत्र, बँक पासबुकची व आधार कार्डाची झेरॉक्स प्रत जोडा अन्यथा निराधार योजना अनुदानापासून वंचित रहाल, असे परिपत्रक शासनाने काढल्याने योजनांच्या लाभार्थ्यांची मोठी तारांबळ उडाली आहे. ही कागदपत्रे जुळवाजुळव करण्यासाठी नागरिकांनी तीन ते चार दिवस तलाठी व तहसीलदार कार्यालयांत हेलपाटे मारावे लागत आहेत. याशिवाय ती जोडण्यासाठी गरीब नागरिकांना सुमारे ३०० ते ४०० रुपये भूर्दंड सोसावा लागतो. वृद्ध व अपंग नागरिकांची दमछाक होत आहे. तालुक्यात या योजनांचे एकूण १८ हजार ५०० लाभार्थी असून शासनाच्या या जाचक अटीमुळे त्यापैकी अनेकांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे. उत्पन्नाचा दाखला सक्तीचा असून तो मुदतीत सादर न केल्यास जुलै महिन्यापासून आर्थिक सहाय्य बंद करावे, लाभार्थीने १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत दाखला सादर केल्यास प्रकरणातील अपरिहार्यता व अपवादात्मक परिस्थिती विचारात घेऊन अर्थसाहाय्य सुरू करावे, अशा आशयाचा आदेश पारित आहे. तहसीलदारांकडून उत्पन्नाचा २१ हजारांचा दाखला मिळवण्यासाठी नागरिकांना आधी तलाठ्याकडून दाखला मिळवावा लागतो. एका तलाठ्याकडे तीन ते चार गावे असल्याने ते वेळेवर उपलब्ध होत नाहीत, अनेक तलाठी दाखल्यासाठी ५० रुपये घेत असल्याचे उघडकीस येत आहे. त्याशिवाय ते दाखल्यास टाळाटाळ करतात. तलाठ्याच्या दाखल्यानंतर त्यावर नायब तहसीलदाराची सही आवश्यक ठरत आहे. त्याशिवाय उत्पन्नाचा दाखला सेतू सुविधा केंद्र संचालक स्वीकारत नाही. सहीनंतरही सेतू केंद्र संचालक एका दाखल्यासाठी १२० रुपये घेत असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांना ८० ते १०० रुपये खर्च करून तालुक्याला यावे लागते.

उत्पन्न दाखल्यासाठी वृद्धांचे होता हेत हाल ^मी एक वृद्ध महिला असून मला चालता येत नाही व डोळ्यांनी दिसतही नाही. मी मुलीच्या मदतीने पायऱ्यांवर हात टेकवत दुसऱ्या मजल्यावर चढून आले. तहसीलदारांकडून उत्पन्नाचा दाखला घेण्यासाठी फार यातना सहन कराव्या लागत आहेत. पहाटेपासून आता दुपारचा एक वाजला, तरी पोटात अन्नाचा कण नसल्याने चक्कर आल्यासारखे वाटत आहे. - लीलाबाई चांभार, बाळद बुद्रूक.

पहिल्या मजल्यावर जाऊन सह्या केल्या ^तलाठ्याच्या दाखल्यानंतर त्यावर नायब तहसीलदारांची सही लागते. आमचे कार्यालय पहिल्या माळ्यावर आहे. िनराधार योजनांचा लाभ घेण्यासाठी अपंग, वृद्धांंना वर चढून येण्यस खूप त्रास होत असल्याचे निदर्शनास आल्याने मी खालच्या मजल्यावर जावून सह्या केल्या. - माेेहन सोनार, नायब तहसीलदार, पाचोरा.

बातम्या आणखी आहेत...