आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील चोसाका निवडणुकीसाठी सर्वपक्षीय पॅनल तयार करण्यात आले आहे. माघारीच्या दिवशी वेळेअभावी काही उमेदवारांचे अर्ज माघार घेण्याचे राहून गेले. अशा १० जणांनी उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल करून, निवडणूक लढवायची नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. मात्र सोमवारी उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली.
त्यामुळे आता चोसाका निवडणूक अटळ आहे. चोसाकाच्या निवडणुकीत माघारीच्या दिवशी सर्वपक्षीय पॅनलला बिनविरोध करण्यासाठी, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी आमदार कैलास पाटील यांनी पुरेपूर प्रयत्न केले.
मात्र, माघारीची वेळ संपल्याने १० जणांचे अर्ज कायम राहिले होते. या सर्वांनी निवडणूक लढवायची नसल्याचे अर्ज न्यायालयाने मंजूर करावेत, किंवा माघार गृहीत धरावी, अशी याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर दि.६ रोजी दुपारच्या सत्रात औरंगाबाद खंडपीठात न्यायमूर्ती चपळगावकर यांच्या समोर सुनावणी झाली. सुनावणीत त्यांची याचिका फेटाळण्यात आली. याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड.अजित काळे यांनी काम पाहिले.
याआधीच अपक्ष उमेदवार प्रकाश रजाळे यांनी आपला अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळे आता चोसाका निवडणूक होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. घोडगाव येथील रजाळे यांनी ऑनलाइन प्रचारही सुरु केला आहे. या निवडणुकीत माजी आमदार कैलास पाटील यांच्या गटाला एकही जागा नसल्याने त्यांचे समर्थक नाराज आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.