आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड वादात:एरंडोल तालुका काँग्रेस अध्यक्षांची निवड वादात

एरंडोलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुका काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुका पार पाडल्या असल्या, तरी एरंडोल तालुका काँग्रेस अध्यक्षपदी योगेश महाजन यांची निवड बेकायदेशीर असल्याची तक्रार सुनील पाटील यांनी केली आहे. त्यांना नियुक्तीपत्र देवू नये अशी लेखी तक्रार जिल्हाध्यक्षांसह मुंबई व दिल्ली येथील पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. एरंडोल तालुक्यातील बाम्हणे येथील काँग्रेस कार्यकर्ते सुनील गोविंदा पाटील यांनी, जळगाव जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्याकडे दि.३० रोजी लेखी तक्रार केली. प्रदेश काँग्रेस कमेटीने एरंडोल तालुका काँग्रेस अध्यक्षपदी योगेश युवराज महाजन यांची निवड केल्याबाबतचे पत्र, दि.२९ रोजी जारी केले. अध्यक्षपदाची निवडप्रक्रिया यापूर्वीच रितसर पार पडलेली असल्याने त्यावेळी योगेश महाजन यांनी अर्ज देखील दाखल केलेला नव्हता. तरी त्यांची तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याचा आक्षेप सुनील पाटील यांनी नोंदवला.

याबाबत वरिष्ठांकडे अपील दाखल करावयाचे असून, अपीलाचा निर्णय लागेपर्यंत योगेश महाजन यांना नियुक्तीपत्र देऊ नये, तसेच तालुकाध्यक्षपदाच्या निवडणुकीची कागदपत्रे (मिटींग अजेंडा, प्रोसिडींग झेरॉक्स, उमेदवारी अर्ज, माघारीचे अर्ज, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय यांसह सर्व कागदपत्रे) मिळावीत अशी मागणी केली आहे. याबाबत वरिष्ठांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...