आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतशिवार:अडावद येथे वीज कार्यालयाला कुलूप ; कांदा लागवडीवर झाला परिणाम

अडावद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील महावितरणच्या उपकेंद्राला सोमवारी सकाळी ११ वाजता १०० ते १५० शेतकऱ्यांनी कुलूप ठोकले. चोपडा येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी तक्रारीचे निवारण करण्याचे आश्वासन दिल्याने कुलूप उघडण्यात आले. गेल्या महिनाभरापासून शेतशिवारात दिवसा वीज मिळत नसल्याने, कांदा लागवडीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी उपकेंद्राला कुलूप ठोकले.सध्या परिसरात कांदा लागवडीला गती मिळाली आहे. मात्र, त्यासाठी शेतकऱ्यांना दिवसा शेतात वीजपुरवठा होणे आवश्यक आहे. मात्र, दिवसा शेतात वीज मिळत नाही. याबाबत तक्रार करूनही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संतापाचा सोमवारी अचानक उद्रेक झाला.

बातम्या आणखी आहेत...