आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Chalisgaon
  • Encouraging Self help Groups, Including Small Entrepreneurs, Through The Food And Music Festival; Rotary Club In Jamnerat, An Initiative Of Anandyatri Family | CHALISGOAN MARATHI NEWS

उत्स्फूर्त प्रतिसाद:खाद्य अन् वाद्य महोत्सवातून लहान‎ उद्योजकांसह बचत गटांना प्रोत्साहन‎; जामनेरात रोटरी क्लब, आनंदयात्री परिवाराचा उपक्रम‎

जामनेर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आनंदयात्री परिवार व सॅटेलाईट‎ क्लबच्या संयुक्त विद्यमाने जामनेर येथे ‎ ‎पाच दिवसीय खाद्य आणि वाद्य ‎ ‎ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले‎ होते. बचत गटाच्या महिलांसह लहान ‎ ‎ उद्योजकांना प्रेरणा मिळावी, म्हणून ‎आयोजित या कार्यक्रमाची व्याप्ती व‎ पाहता रोटरी क्लबचे डस्ट्रीक्ट गव्हर्नर‎ रमेश मेहर यांनी गरजूंना स्मोकलेस‎ चुल, शिलाई मशिन असे साहित्य‎ देण्याची घोषणा केली.‎ जामनेर येथील आनंदयात्री‎ परिवारातर्फे १० ते १४ मार्च या काळात‎ पाच दिवस खाद्य आणि वाद्य‎ महोत्सवाचे आयोजन केले होते.‎

कोरोनामुळे दोन वर्षांपासून अडचणीत‎ असलेल्या व्यावसायिकांसह बचत‎ गटाच्या महिलांनी मोठ्या प्रमाणावर‎ सहभाग घेतला. या कार्यक्रमाच्या‎ माध्यमातून जामनेरकरांना खाद्य, वाद्य,‎ संगीत व मुलांसाठी खेळण्यांची पर्वणी‎ मिळाली. तहसीलदार अरूण शेवाळे,‎ पोलिस निरिक्षक किरण शिंदे‎ यांच्याहस्ते गुरूवारी उद्घाटन झाले.‎ शुक्रवारी प्रमुख पाहूणे म्हणून‎ मुख्याधिकारी चंद्रकांत भासले,‎ डॉ.प्रशांत भोंडे, जितेंद्र पाटील,‎ पुखराज डांगी, प्रकाश पाटील, राहुल‎ ‎रोईमुळे, कवयित्री बहिणाबाई चौधरी‎ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील‎ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दीपक‎ पाटील, सिनेट सदस्य नितीन झाल्टे‎ आदी मान्यवर उपस्थित होते.

सोमवारी‎ समारोपाला रंगकर्मी शंभू पाटील, टिव्ही‎ कलावंत हर्षल पाटील, विनोद लोढा,‎ चित्रकार पिसर्वो आदी उपस्थित होते.‎ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुधीर‎ साठे, नितीन राऊत, डॉ.स्वाती‎ विसपूते, प्रा.कांचन महाजन यांनी केले.‎ आमदार गिरीश महाजन यांनी भेट‎ देऊन खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला.‎ महोत्सवाला प्रतिसाद लाभला.‎

बातम्या आणखी आहेत...