आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतूक कोंडी:चोपड्यातील अतिक्रमणाने कोंडला‎ बाजाराचा श्वास, प्रशासनाचे दुर्लक्ष‎

चोपडा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील रस्ते आणि त्यावर‎ दुकानदार, हातगाडीचालकांनी‎ केलेले अतिक्रमण रहदारीसाठी‎ अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे‎ शहरातील छत्रपती शिवाजी‎ महाराज चौक, भाजीपाला मार्केट,‎ मुख्य बाजारपेठ, शनी मंदिररोड व‎ थेट गोलमंदिरापर्यंतच्या मुख्य‎ रस्त्यावर दररोज अनेकदा वाहतूक‎ कोंडी होते.‎ चोपडा शहरातील रहदारीची‎ समस्या दिवसेंदिवस वाढत आहे.‎ या प्रकारामुळे वाहनधारक आणि‎ दुकानदारांमध्ये वादही होत आहेत.‎ छत्रपती शिवाजी महाराज‎ पुतळ्याच्या समोरील भागात‎ रस्त्यावर उभ्या असणाऱ्या‎ भाजीपाल्याच्या गाड्यांमुळे समस्या‎ वाढते.

तसेच मुख्य बाजारपेठेत‎ रस्त्याच्या दोन्ही बाजूला बेशिस्तपणे‎ हातगाड्या लावल्या जातात.‎ पोलिसांचे वाहन सायरन वाजवत‎ येताच, हातगाड्या मागे सरकवल्या‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ जातात. मात्र, पोलिसांचे वाहन‎ जाताच पुन्हा स्थिती जैसे थे होते.‎ पालिका प्रशासनाचेही याकडे दुर्लक्ष‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्य‎ नागरिकांचा बहुमूल्य वेळ वाहतूक‎ कोंडीत वाया जातो.‎

पोलिस ठाण्यात प्रभारीराज
‎पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांनी काही वर्षांपूर्वी‎ चोपडा शहरात, अतिक्रमण काढण्याचा मोठा निर्णय घेतला होता. मात्र काही‎ दिवसातच पुन्हा अतिक्रमण जैसे थे झाले होते. त्यामुळे मुख्य बाजारपेठेतील‎ समस्या कायम आहे. हे अतिक्रमण काढण्यासाठी पालिका प्रशासन व‎ पोलिसांनी संयुक्त कारवाई करणे गरजेचे आहे. चोपडा शहर पोलिस‎ ठाण्यात सध्या प्रभारी राज आहे. पूर्णवेळ पोलिस निरीक्षक नाहीत.‎

बातम्या आणखी आहेत...