आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नदी पात्र:नदी पात्रांमधील अतिक्रमण, धोकादायक होर्डिंग्ज त्वरित हटवा, स्थलांतराची सोय करा ; यंत्रणा सज्ज

चाळीसगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाळ्यापूर्वी प्रामुख्याने नगरपालिका क्षेत्रातील नाले सफाई, ड्रेनेज, पाइपलाइन दुरुस्ती तत्काळ करा. नदीपात्रातील अतिक्रमणे तातडीने काढावी, तसेच धोकादायक होर्डिंग्स ताबडतोब काढावेत, असे निर्देश प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांनी दिले. तितुर, डोंगरी व गिरणा नद्यांच्या काठी वसलेल्या गावांबाबत विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. ज्या गावांमध्ये, वसाहतींमध्ये अति पर्जन्याची शक्यता आहे, तसेच गेल्या वर्षात ज्या ज्या ठिकाणी जास्त पाऊस झाला आहे, अशा सर्व ठिकाणी स्थलांतराची पर्यायी व्यवस्था म्हणून शाळा, समाज मंदिर, इतर सुरक्षित ठिकाणे तयार ठेवावीत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. तहसील कार्यालयात नुकतीच मान्सून पूर्व तयारीबाबत प्रांताधिकारी साताळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्यावेळी आढावा घेताना ते बोलत होते. गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे तालुकावासीयांना मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागले होते. नद्यांना तब्बल सात पूर आलेत. त्यामुळे आगामी मान्सून काळात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी सर्व यंत्रणांनी आवश्यक उपाययोजनांची तयारी पावसाळ्यापूर्वीच पूर्ण करुन घ्यावी. हानी टाळण्याकरता यंत्रणा सज्ज ठेवावी. त्यासाठी सतर्क राहून समन्वयाने काम करावे, अशा सूचना साताळकरांनी दिल्या. या बैठकीत कन्नड घाटात उद्भवणाऱ्या समस्यांवरही चर्चा झाली.

बातम्या आणखी आहेत...