आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेश‎:ग्रामीण मतदारसंघांती राष्ट्रवादीच्या‎ पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश‎

धरणगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव ग्रामीण मतदार संघातील राष्ट्रवादी‎ काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ६ नोव्हेंबर रोजी शिवसेना‎ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुंबई येथील मातोश्री या‎ निवासस्थानी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. यात‎ प्रामुख्याने रमेश पाटील, उमेश पाटील, प्रवीण पाटील, छोटू‎ पाटील, भाऊसाहेब सोनवणे, डॉ. जुबेर खान, चेतन‎ सोनवणे यांचा समावेश हाेता.

या वेळी जिल्हा संपर्क प्रमुख‎ संजय सावंत, सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा‎ प्रमुख विष्णू भंगाळे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख‎ महानंदा पाटील, उपमहापौर कुलभूषण पाटील, विरोधी‎ पक्षनेते सुनील महाजन, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख नीलेश‎ चौधरी, महानगर प्रमुख शरद तायडे, अॅड. शरद माळी,‎ राजेंद्र ठाकरे अादी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...