आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध स्पर्धांचे आयोजन:म्हसवेत पर्यावरणपूरक गणेशोत्सव, चित्रकला, रांगोळी अन् मैदानी स्पर्धा

पारोळा24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्ञानदीप बहुद्देशीय विद्या प्रसारक मंडळ संचालित म्हसवे येथील माध्यमिक विद्यालयात गणपती विसर्जन करण्यात आले.गणेशात्सवानिमित्त शाळेत मैदानी स्पर्धेचे आयोजन केले हाेते. यानिमित्त इको-फ्रेंडली गणपती तयार करण्यात आले हाेते. या दहा दिवसांच्या काळात रांगोळी व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. मुख्याध्यापिका सरिता देशमुख यांच्या मार्गदर्शनात सप्ताहात शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले हाेते.

तर मैदानी स्पर्धेत लिंबू-चमचा, संगीत खुर्ची, धावण्याची शर्यत आदी स्पर्धा घेण्यात आल्या. यात पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. दरम्यान, विसर्जनाच्या दिवशी मुख्याध्यापिका सरिता देशमुख यांनी महाआरती केली. त्यानंतर प्रसाद म्हणून मोदकाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी जितेंद्र पवार, शरद पाटील, शोभा बेहेरे, ललिता सूर्यवंशी, वैशाली पाटील, विजय महाजन, गोरख पाटील, उमाकांत बाविस्कर, विनोद पाटील यांनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...