आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:एरंडोलला 25 ठिकाणी सीसीटीव्ही; आमदार चिमणराव पाटील यांच्याहस्ते यंत्रणेचे लोकार्पण

एरंडोल2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात नगरपालिकेने ठिकठिकाणी बसवलेल्या २५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे सोमवारी आमदार चिमणराव पाटील यांच्याहस्ते लोकार्पण झाले. या यंत्रणेमुळे गुन्हेगारीला आळा बसेल असे त्यांनी यावेळी सांगितले.अमळनेर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव अध्यक्षस्थानी होते. भाजपचे जनजातीय क्षेत्राचे प्रमुख अॅड.किशोर काळकर, माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी, राजेंद्र चौधरी, बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड प्रमुख पाहुणे होते. पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी विकास नवाळे आणि पालिकेने केलेल्या कार्याचा यावेळी गौरव केला.

शहरातील सीसीटीव्ही यंत्रणेमुळे आता गुन्हेगारांच्या हालचालींवर पोलिसांना नजर ठेवता येणार आहे. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी प्रास्ताविक केले. माजी नगरसेवक जहिरोद्दिन शेख कासम,अभिजित पाटील, योगेश महाजन, बबलू चौधरी, डॉ.सुरेश पाटील, चिंतामण पाटील, असलम पिंजारी, नितीन महाजन, विजय पाटील, राजेंद्र शिंदे उपस्थित होते. शहरात सीसीटीव्ही यंत्रणा उभारल्याने आता, सर्व हालचाली कॅमेऱ्यात कैद होणार आहेत.

एरंडोल शहरात या ठिकाणी तिसरा डोळा
शहरात बसस्थानक, कासोदा नाका, डॉ.आंबेडकर चौक, बुधवार दरवाजा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महात्मा फुले पुतळा, भगवा चौक, पीर बाखारूम बाबा, पांडववाडा, राममंदिर, म्हसावद नाका, आय.लव्ह एरंडोल चौक, बीएसएनएल कार्यालय, चुनाभट्टी, बरकनदास मशिद, जयहिंद चौक, बडी मशिद, कासोदा दरवाजा आदी ठिकाणी सीसीटीव्ही बसवले आहेत.

बातम्या आणखी आहेत...