आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा:एरंडोलला मॅरेथॉन स्पर्धा, 480 जणांचा सहभाग

एरंडोल3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व क्रीडा विभाग, विद्यार्थी कल्याण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्रसेना यांच्या संयुक्त विद्यमाने, भव्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत एकूण २५० पुरुष तर, २३० महिला असे एकूण ४८० स्पर्धक सहभागी झाले होते.

स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष अमित पाटील व प्राचार्य एन. ए. पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवून केले. स्पर्धेसाठी पुरुषांसाठी अंतर पाच किमी व महिलांसाठी तीन किमी होते. पुरुषांची स्पर्धा नवीन महाविद्यालयाच्या आयटीआय इमारतीपासून सुरु झाली. तर मुलींच्या स्पर्धेची सुरुवात जुन्या महाविद्यालयाच्या प्रांगणापासून झाली. स्पर्धेचा मार्ग म्हसावद नाका, मरीमाता चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, एरंडोल पालिका, वसुंधरा पार्क, अमळनेर दरवाजा, नागोबा मढी, महात्मा फुले चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, आर.टी.काबरे विद्यालय, म्हसवाद नाका व शेवट जुन्या महाविद्यालयाचे प्रवेशद्वार असा होता. यात पुरुषांसाठी पाच पारितोषिक व महिलांसाठी पाच पारितोषिक ठेवण्यात आले होते. यात बक्षीस पात्र विद्यार्थी स्पर्धकांचा गौरव करण्यात आला. क्रीडा संचालक प्रा. के. जे. वाघ, प्रा. मनोज पाटील यांनी नियोजन केले. उपप्राचार्य डॉ. अरविंद बडगुजर, उपप्राचार्य प्रा. आर. एस. पाटील यांचे सहकार्य लाभले. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त राबवण्यात आलेल्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तालुकाभरातून स्पर्धक सहभागी झाले होते.

हे ठरले विजेते
विजेते स्पर्धेक पुरुषांमधून- प्रथम पारितोषिक - रोहन कैलास वारे, द्वितीय- यश संजय चौधरी, तृतीय-प्रत्युष शिवाजी महाजन, चतुर्थ- तेजस साहेबराव धनगर, पाचवा- सुरज छोटूसिंग राजपूत, महिलांमधून प्रथम पारितोषिक- प्रियंका दत्तात्रय चौधरी, द्वितीय पारितोषिक- मेघा संजय मराठे, तृतीय- मोहिनी अशोक महानन, चतुर्थ-अश्विनी युवराज निकम, पाचवे पारितोषिक- प्रेरणा अनिल मराठे, उत्तेजनार्थ- संजना कुंभार.

बातम्या आणखी आहेत...