आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्याचे स्मरण:एरंडोलला संत तुकाराम महाराज जयंती‎

एरंडोल‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील पाटील वाडा भागात दि.२‎ रोजी संत तुकाराम महाराज यांची‎ जयंती उत्साहात साजरी करण्यात ‎ ‎ आली. सर्वप्रथम शिवाजीराव‎ अहिरराव यांच्या हस्ते संत तुकाराम ‎महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन‎ करण्यात आले.‎ कार्यकमाचे प्रास्ताविक माजी ‎ नगरसेवक मनोज पाटील यांनी‎ केले. आभार प्रदर्शन‎ आर.एस.पाटील यांनी केले. इतर‎ मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.‎ मान्यवरांनी जगतगुरू तुकाराम‎ महाराज यांचा जीवनपट उलगडला.‎

४०० वर्षांपूर्वी आपल्या अभंगाच्या‎ माध्यमातुन अनिष्ठ रुढी परंपरा,‎ अंधश्रद्धा व धार्मिकतेच्या मुळावर‎ घाव घालून, बहुजन समाजाला‎ अज्ञानाच्या अंधकारातून मुक्त‎ करणारे संत म्हणजे तुकाराम‎ महाराज होय. आपले कर्जखाते‎ इंद्रायणी नदीत बुडवून, जगात‎ शेतकऱ्यांना पाहिली कर्जमाफी देणारे व शिवरायांचे खरे गुरु म्हणते‎ संत तुकाराम महाराज होय, असे‎ विचार यावेळी मान्यवरांनी व्यक्त‎ केले.

कार्यक्रमाप्रसंगी शिवाजीराव‎ अहिरराव, डॉ.सुरेश पाटील,‎ प्रा.मनोज पाटील, आर्शिवाद‎ पाटील, मंगेश पाटील, सुभाष‎ ‎ पाटील, अरुण पाटील, मनोज‎ पाटील, रामचंद्र पाटील,‎ आर.डी.पाटील, ऋषिकेश पाटील,‎ डॉ.प्रशांत पाटील, रवींद्र पाटील,‎ डॉ.प्रमोद पाटील, दत्तात्रय पाटील,‎ डॉ.शामकांत पाटील, शांताराम‎ अपार उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...