आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाण्यावाचून शेती नाही, गावाच्या शिवारात एक नाही तर दोन दोन धरणे आहेत. परंतु, अपूर्ण पाणलोट क्षेत्र असल्याने ते परिपूर्ण भरत नाहीत. त्यामुळे गावापासून जवळच असलेल्या नगाव गावातील शिवारातून पाटाचे जाणारे पाणी पाट-चारीच्या माध्यमातून या धरणात सोडले तर या गावाचा कायापालट होणार, यात शंका नाही. यासाठी शेतकऱ्यांनी एकजूट करून संघटन केल्याशिवाय पर्याय नाही. आपल्या गावाचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी या शाखेच्या माध्यमातून प्रयत्न करू, असे प्रतिपादन महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील देवरे यांनी केले.
बाभळेनाग येथे शेतकरी संघटनेच्या शाखा स्थापनेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. प्रास्ताविक नाना पाटील यांनी केले. शाखेच्या नियोजन संदर्भात तसेच शाखा शेतकऱ्यांना किती लाभदायी आहे, याचे तालुकाध्यक्ष डॉ. विनोद चौधरी यांनी महत्त्व पटवून सांगितले. प्रमुख पाहुणे म्हणून गावातील सर्व आजी-माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन, सदस्य व ज्येष्ठ नागरिक, युवक उपस्थित होते. याप्रसंगी बाभळेनाग गावात महाराष्ट्र शेतकरी संघटनेची शाखा स्थापन करण्यात आली. या वेळी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मयूर ठाकूर यांनी आभार मानले.
यांचा अाहे कार्यकारिणीत समावेश ... शाखाध्यक्ष म्हणून मयूर ओंकार ठाकूर, कार्याध्यक्षपदी सागर पुंडलिक माळी, माहिती प्रमुख म्हणून अमोल साहेबराव बाविस्कर, उपाध्यक्षपदी सागर वसंत माळी, संपर्क प्रमुखपदी समाधान पुंडलिक माळी, खजिनदारपदी धनराज नारायण माळी, महासचिवपदी राकेश माळी, सचिव म्हणून भीमराव भावलाल माळी, प्रसार माध्यम प्रमुख म्हणून रवींद्र सुरेश माळी, सल्लागार म्हणून हिरालाल लक्ष्मण मरसाळे, ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून आधार सोमा ठाकूर, आरोग्य प्रमुख म्हणून जगदीश विकास माळी तर सदस्यपदी अरूण लोटन माळी, भाऊसाहेब हिरालाल माळी, दगडू फकिरा माळी, रोजेसिंग युवराज पाटील, सखाराम धुडकू माळी, कैलास संतोष माळी, जितेंद्र लोटन माळी, भीमराज युवराज माळी, शांताराम लहू माळी यांची निवड करण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.