आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:सायंकाळी विश्राम गृहात आढावा बैठक; राष्ट्रवादीच्या बैठकीत भडगाव पालिका निवडणुकीची चर्चा

भडगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

भडगाव पालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे २८ रोजी सायंकाळी विश्राम गृहात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा भडगावचे निरीक्षक डॉ. संजीव पाटील तर पाचोरा पालिकेचे गटनेते संजय वाघ उपस्थित होते.

ही बैठक भडगाव विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे, भडगाव तालुकाध्यक्ष राहुल पाटील, शहराध्यक्ष शाम भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. प्रारंभी भडगावच्या निरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल डॉ. संजीव पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन व संचालक यांच्या निवडीबद्दल ज्येष्ठ नेते शिवाजीराव पाटील, बी. वाय. पाटील, रवींद्र महाजन, डी. डी. पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बैठकीत ज्येष्ठ नेते विनय जकातदार, नितीन तावडे, संजय वाघ व डॉ. संजीव पाटील यांनी मार्गदर्शन केले. बैठकीस सुभाष बोरसे, निमन शेख, भोला चौधरी, बी. वाय. पाटील, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा योजना पाटील, हर्षा पाटील, भडगाव तालुकाध्यक्षा रेखाताई पाटील, कामगार आघाडीचे सुरेंद्र मोरे, कार्याध्यक्ष हर्षल पाटील, युवक तालुकाध्यक्ष स्वप्निल पाटील, उपाध्यक्ष विकी पाटील, प्रवक्ते भूषण पाटील, विवेक पवार, अल्पसंख्यांक आघाडीचे शहराध्यक्ष शेरा भाई, रवींद्र महाजन,डॉ. सुनील पाटील, अनिल टेकडे, अरुण मोरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन हर्षल पाटील यांनी तर भूषण पाटील यांनी आभार मानले.