आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विसर्ग:गिरणा धरणात दररोज 1200 क्युसेस आवक, तेवढाच नदीत होतोय विसर्ग

चाळीसगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गिरणा धरण नाशिक जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात असले तरी याचा सर्वाधिक फायदा जळगाव जिल्ह्याला होतो. या धरणात सध्या १०० टक्के साठा आहे. यंदा पहिल्यांदाच नोव्हेंबरमध्येही गिरणा नदी प्रवाहीत आहे. १ नोव्हेंबरपासून धरणात १२०० क्युसेस पाण्याची आवक सुरू असून तेवढाच विसर्ग नदीपात्रात केला जात आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे अधिकारी हेमंत पाटील यांनी दिली.

मालेगाव मनपा, नांदगाव ५६ गावांची पाणीयोजना, दहिवाळ पाणीपुरवठा योजनेसह चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, पारोळा, अमळनेर या तालुक्यांना धरणातून सिंचनासाठी पाणी मिळते. त्यामुळे या तालुक्यांना यंदा दिलासा आहे. जिल्ह्याच्या सहा तालुक्यातील सुमारे ५७ हजार हेक्टर क्षेत्र गिरणा धरणाच्या पाण्याने भिजते. तर चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल व धरगाव पालिकांसह १५८ ग्रामीण पाणीपुरवठा योजना गिरणा धरणावर अवलंबून आहेत.

आवर्तनासाठी बैठक होणार
खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने, शेतकऱ्यांची मदार आता रब्बीवर आहे. मात्र, रब्बीसाठी धरणातून किती आवर्तने मिळतील याचा निर्णय झालेला नाही. यासंदर्भात मंत्रालय स्तरावर बैठक होऊन, त्यात निर्णय घेतला जाईल.

गिरणा धरणाची आकडेवारी
धरणात २१,५०० दलघफू मृतसाठा असून, तीन हजार दलघफू उपयुक्त साठा आहे. धरणाचे एकूण लाभक्षेत्र ६९ हजार हेक्टर, तर जळगाव जिल्ह्यातील लाभक्षेत्र ५७ हजार २०९ हेक्टर आहे. १५८ ग्रामीण व पालिकांच्या चार योजना अवलंबून आहेत.

बातम्या आणखी आहेत...