आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेतृत्व:राष्ट्रहितासाठी नेतृत्व गुण प्रत्येकाने जोपासा ; जेसीआय चाळीसगाव सिटीतर्फे आयोजित

चाळीसगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्र हितासाठी प्रत्येकाने नेतृत्व गुण जोपासला पाहिजे. तसेच नेतृत्व करणे हे आपले कर्तव्य आहे, असे आवाहन जेसीआयचे झोन ट्रेनर, माजी अध्यक्ष तथा वसुंधरा फाउंडेशनचे सचिन पवार यांनी केले. ते शहरातील रंभाई आर्ट गॅलरी येथे नॅशनल ट्रेनिंग डे निमित्ताने जेसीआय चाळीसगाव सिटीतर्फे आयोजित प्रशिक्षण कार्यक्रम प्रसंगी ‘लिडींग इज् अवर ड्युटी’ या विषयावर बोलत होते. यावेळी अध्यक्ष धर्मराज खैरनार, माजी अध्यक्ष देवेन पाटील, सचिव मयूर अमृतकार, प्रकल्प प्रमुख धीरज जैन आदी मान्यवर उपस्थित होते. सचिन पवार म्हणाले की, एक उत्तम नेतृत्वगुण असलेली व्यक्ती एक चांगला समाज घडवू शकते. काळाची गरज ओळखून स्वतः नेतृत्व करत समाजाला पुढे नेले पाहिजे. आपल्या आवडत्या क्षेत्रात काम केल्याने माणूस त्या क्षेत्राला वेगळी चकाकी देवू शकतो. त्यांनी अनेक थोर मंडळींची उदाहरणे देत उपस्थितांना यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी जेसी संजय पवार, अफसर खाटीक, नरेंद्र शिरुडे, मनोज पाटील, मंगेश जोशी, सलमान खान, बापूसाहेब खैरनार, कमलेश पवार, सदाशिव खैरनार, सागर ठाकरे आदी उपस्थित होते. आभार वकार बेग यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...