आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातळेगाव येथे आयाेजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिराचा अनेक गरजूंनी लाभ घेतला. या वेळी तज्ज्ञांनी रुग्णांची तपासणी करुन त्यांना मार्गदर्शन केले. पळासखेडा येथील प्रकाशचंद जैन मल्टिस्टेट हॉस्पिटल, आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर तसेच तळेगाव येथील जय किसान विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात सर्व विकारांची मोफत तपासणी करुन उपचार करण्यात आले. या शिबिरात डॉ. कोमलकुमार डाकलिया, डॉ. हेमंत नारखेडे, डॉ. नरेंद्र राका, डॉ. निकुंज गुजराथी, डॉ. मनीषा राका, डॉ. उज्ज्वला राणे, डॉ. मयूर जाधव यांनी रुग्णांची तपासणी केली.पंचक्रोशीतील गरजू रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला.
सूत्रसंचालन अकोश कोळी यांनी केले. या वेळी गावातील डॉ. स्वप्नील पाटील व विकास सोसायटी चेअरमन संतोष माळी,सदस्य युवराज वंजारी, माधव माळी, कौतिक माळी, उत्तम माळी, आत्माराम कोळी, अरुण घोरपडे, शांताराम मंगळकर, नंदू पाटील, राजू माळी, जगन्नाथ नाईक, राहुल जिरेमाळी, सांडूबा वंजारी, सचिव दिलीप चौधरी, पंकज माळी, नीलेश काेळी, नीलेश घुगे, गाेपाळ काेळी, कैलास पाटील, दीपक पाडाेळसे, गाेपाल सपकाळ, अजय काेळी, सुधाकर वाघ, याेगेश वंजारी, भूषण घुगे, उत्तम तेली, ज्ञानेश्वर उबाळे, व सर्व सदस्य तसेच माेठ्या संख्येने तळेगावसह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
६० रुग्णांची नेत्र तपासणी ...
या शिबिरात पंचक्रोशीतील गरजू रुग्णांची तपासणी करण्यात आली. यात ६० रुग्णांची नेत्र तपासणी, ५० बालरोग, ५० त्वचारोग, ३० स्त्रीरोग, ६० प्रमेय सांधे-रोग हृदयरोग तर ७० रुग्णांची रक्त तपासणी अशा एकूण ३२० रुग्णांची तपासणी करुन त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले. नंदू पाटील यांनी आभार मानले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.