आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:मोफत शिबिरात 336 रुग्णांची तपासणी

चाळीसगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठा सेवा संघ परिवार तसेच बापजी जीवन दीप मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटलचे संचालक डाॅ.संदीप देशमुख यांच्या विशेष सहकार्याने बापजी हाॅस्पिटलमध्ये आयाेजित मोफत आरोग्य शिबिरात जवळपास ३३६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. मराठा सेवा संघाच्या ३२ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम राबवण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीप देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून सुधीर पाटील, डाॅ.संदीप देशमुख, डाॅ.सुधन्वा कुलकर्णी, डाॅ.सतीश मिश्रा, डाॅ.संदीप साहू, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अरुण पाटील, डी.वाय. चव्हाण, शहर सचिव मनोहर सूर्यवंशी, जी.जी. वाघ आर.बी. जगताप, अविनाश देशमुख, नगरसेवक रामचंद्र जाधव, दीपक पाटील, दिनेश पाटील, आण्णासाहेब धुमाळ, संजीव ठाकरे, जयसिंग राजपूत यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

ज्यांना भयंकर कोरोना आजार होऊन गेला आहे आणि अशा रुग्णांना काही साइड इफेक्ट जाणवत आहेत अशा रुग्णांसाठी पल्मोनरी, फंक्शन टेस्ट(स्पायरोमेट्री), फुफ्फुसांची तपासणी मुंबई, पुणे, नाशिक या ठिकाणी ५०० ते १००० रुपयांत केली जाते. ती तपासणी या शिबिरात नाममात्र दरात करण्यात आली. तसेच ज्या रुग्णांना मोतीबिंदू निघाला अशा रुग्णांना अल्पशा दरात आणि महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य विमा योजनेत समावेश करुन शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. या शिबिरात फुफ्फुसांची तपासणी, नेत्र तपासणी, मधुमेह तपासणी, फिजिओथेरपी तपासणी अशा ३३६ रुग्णांची तपासणी करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...