आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:सहलीला जाणाऱ्या बसचा अपघात; 4 विद्यार्थी जखमी

अमळनेर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागातील तापी जिल्ह्यातील कुकरमुंडा तालुक्यातील राजपूर गावाजवळ सहलीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी भरलेली बस उलटली. यामध्ये सुमारे ४ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सकाळी आठ वाजता सुमारास अपघात झाल्याची माहिती निझर पोलिसांनी दिली आहे.

अमळनेरहून गुजरात राज्यातील पावागडला सहलीला जाणाऱ्या खासगी प्रवासी बसचा अपघात झाला. बसमध्ये दहावीत शिकणारे ५१ विद्यार्थी आणि शिक्षकांसह ६५ प्रवासी होते. बस चालकाच्या चुकीने बस रस्त्याच्या कडेला उतरली. बस विजेच्या खांबाला धडकून उलटली.

यात चार विद्यार्थी जखमी झाले आहे. अमळनेर शहरातील लोकमान्य हायस्कूलचे विद्यार्थी होते. विश्वकर्मा टूरिस्ट ट्रॅव्हल्स खाजगी बस चालकाने घटनास्थळावरून फरार झाला आहे. ही माहिती मिळताच निझर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...