आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहादिवसीय आयोजन:चिमुकल्यांकडून कलागुणांचे प्रदर्शन; पाचोरा येथे आयोजित बालसंस्कार शिबिराची सांगता

पाचोरा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील शक्तिधाम येथे प्रथमच वारकरी बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी त्याची माेठ्या उत्साहात सांगता झाली. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मुलांकडे लक्ष देण्यास आपणास वेळ नाही. मुले मोबाइल आणि कॉम्प्युटरच्या आहारी जात आहेत. मुलांमध्ये संस्काराची कमी भासते.

सध्या धर्मापासून, संस्कारापासून लांब जाणाऱ्या समाजात बाल गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन शहरातील लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्थेने सामाजिक भान राखून संस्थाध्यक्ष सुनीता पाटील व त्यांचे पती तथा संस्था प्रमुख भागवताचार्य योगेश महाराज धामणगावकर यांनी संजय महाराज पाचपोर यांच्या मार्गदर्शनात उन्हाळी वारकरी बाल संस्कार शिबिराचे आयोजन केले.

तेथे विद्यार्थ्यांना वारकरी शिक्षणाबरोबर गीता पाठ, हनुमान चालीसा, ज्ञानेश्वरी व तुकाराम गाथा तसेच मृदुंग आणि गायनाचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. हे शिबिर १५ मेपर्यंत होणार आहे. गुरुवारी या शिबिराची सांगता झाली. कृष्णापुरी छत्रपती शिवाजी महाराज चौक, सराफ बाजार, गांधी चौक या ठिकाणी सर्व वारकऱ्यांनी तालासुरात प्रयोग करून दाखवला. शिबिरासाठी रमेश मोर, प्रा. अजय थेपडे, सुजित तिवारी व परिवार, डॉ.विष्णू पाटील, अविनाश पाटील, डॉ.गवांदे, रवि मोर सहकार्य लाभले.

पाचोरा येथे आयोजित बालसंस्कार शिबिराची सांगता

चिमुकल्यांकडून कलागुणांचे प्रदर्शन

पाचोरा

बातम्या आणखी आहेत...