आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध कार्यकारी सेवा‎ सहकारी सोसायटीत नोंदणी:हरभरा खरेदी नोंदणीसाठी‎ 31 मार्चपर्यंत मुदतवाढ‎

यावल‎6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील शासकीय हमीभाव‎ हरभरा खरेदी केंद्रावरील‎ नोंदणीसाठी शासनाने मुदतवाढ‎ दिली. यापूर्वी नोंदणीसाठी १५‎ मार्चपर्यंत मुदत होती. ती आता ३१‎ मार्चपर्यंत वाढवली.‎ रब्बी हंगामात उत्पादित‎ हरभऱ्याच्या खरेदीसाठी नाफेडच्या‎ केंद्रावर नोंदणी सुरू केली होती.‎ त्यासाठी १५ मार्चपर्यंत मुदत होती.‎ या मुदतीत ७७५ शेतकऱ्यांनी नोंदणी‎ केली. आता ३१ मार्चपर्यंत‎ नोंदणीसाठी मुदतवाढ मिळाली.‎ उपअभिकर्ता संस्था म्हणून‎ कोरपावली विविध कार्यकारी सेवा‎ सहकारी सोसायटीत नोंदणी सुरू‎ आहे.‎ येथे शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी येताना‎ शेतकऱ्यांनी आधारकार्डची‎ झेरॉक्स, बँकेचे पासबुक झेरॉक्स,‎ हरभरा पिकाची नोंद असलेला चालू‎ रब्बी हंगामाचा ऑनलाइन ७/१२‎ उतारा सोबत आणावा. शेतमालाची‎ रक्कम बँक खात्यात ऑनलाइन‎ पद्धतीने जमा होईल. त्यामुळे बँक‎ खात्याची माहिती बिनचूक द्यावी,‎ असे आवाहन संस्थेचे चेअरमन‎ राकेश फेगडे यांनी केले.‎

बातम्या आणखी आहेत...